23 February 2019

News Flash

Video : राधे माँची मुख्य भूमिका असलेल्या ‘राह दे माँ’ वेब सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.

राधे माँची मुख्य भूमिका असलेल्या 'राह दे माँ' वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

वेब सीरिजना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे यात दररोज वेगवेगळ्या विषयांची भर पडत आहे. मोठमोठे बॉलिवूड कलाकारसुद्धा डिजीटल प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवत आहेत. अशातच वेब सीरिजच्या विश्वात एक आश्चर्यकारक एण्ट्री झाली आहे. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँने एका वेब सीरिजची निर्मिती केली असून त्यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. ‘राह दे माँ’ असं या वेब सीरिजचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आता राधे माँ म्हटल्यावर ही वेब सीरिज धार्मिक किंवा आध्यात्मिक असेल असं अनेकांनी गृहित धरलं असणार. पण तसं नसून एका वेगळ्यात मुद्द्यावर यात भाष्य केलं गेलंय. ट्रेलरची सुरुवातच एका बोल्ड दृश्याने होत असून त्यात समलैंगिकतेचा मुद्दा मांडला आहे. राधे माँच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांवर ही वेब सीरिज आधारित आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राधे माँचे मॉर्डन लूकमधले काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो या वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील असल्याचं समोर आलं आहे. विविध कारणांमुळे चर्चेत आलेली आणि वादग्रस्त ठरलेली राधे माँ वेब सीरिजच्या माध्यमातून अशा प्रकारे समोर आल्याने अनेकांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

 

First Published on August 10, 2018 12:22 pm

Web Title: trailer of raah de maa released radhe maa is in lead role watch video