17 January 2021

News Flash

एका लक्ष्मीची दुसऱ्या लक्ष्मीसाठी पोस्ट, अक्षय कुमार म्हणाला….

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

नुकताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडणवाणी यांच्या मुख्य भूमिका असणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. भारतामध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अक्षय आपल्या चित्रपटातून ट्रान्सजेंडर समुदायाच्या संवेदना पडद्यावर मांडणार आहे. अक्षय कुमार भूमिका साकरणार असल्यामुळे ट्रान्सजेंडर समुदायामध्ये आनंदाचं वातावरण आहे. ट्रांसजेंडर एक्टिविस्ट लक्ष्मी शुक्ला यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर पाहून आनंद व्यक्त केला आहे.

लक्ष्मी शुक्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून ट्रेलरला धमाकेदार म्हटले आहे. या व्हिडीओत लक्ष्मी म्हणतेय की, लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार आहे. माझेही नाव लक्ष्मी असल्याचा आनंद होत आहे. या ट्रेलरची भरपूर उत्सुकता होती. लिव लाइफ क्वीन साइज. आम्ही तर एखाद्या महाराणीसारखं जगतो. सध्या सर्वांना लक्ष्मीची गरज आहे. ट्रेलर पाहून माइंड रिफ्रेश झालं. ट्रन्सजेंडरच्या संवेदना आणि अडचणींना मोठ्या पडद्यावर घेऊन आल्याबद्दल अक्षय आणि टीमचं मनापासून आभार व्यक्त करते.

लक्ष्मी शुक्ला यांच्या या व्हिडीओवर अक्षय कुमारनेही प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ पाहून अक्षय म्हणतो की, फक्त लक्ष्मी नावच बसं झालं. एका लक्ष्मीचं दुसऱ्या लक्ष्मीसाठीचं प्रेम पाहून आनंद झाला. धन्यवाद….

लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशात काही ठराविक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 9:29 pm

Web Title: transgender activist laxmi praises akshay kumar laxmibomb trailer and this is how the actor reacts nck 90
Next Stories
1 जुन्या अंजली भाभीने व्यक्त केली पुन्हा ‘तारक मेहता’मध्ये काम करण्याची इच्छा, पण निर्माते म्हणाले..
2 डिस्लाइकच्या भीतीमुळे अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचे लाईक आणि डिस्लाइक केले हाईड?
3 “डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये कबीर साकारताना…”, सांगतोय अनुराग वरळीकर
Just Now!
X