20 January 2021

News Flash

म्हणून अली फजलवर होत आहे बहिष्कार टाकण्याची मागणी ?

यापूर्वी मिर्झापूर २वर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती..

अ‍ॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर २ हे वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सीरिज २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण सोशल मीडियावर सीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मिर्झापूर २मध्ये गुड्डू पंडितची भूमिका साकारणारा अभिनेता अली फजलने वक्तव्य केले. पण त्याच्या वक्तव्यानंतर बॉयकॉट अली फजल ट्विटरवर ट्रेंड होत असल्याचे म्हटले जात आहे.

अली फजलने नुकताच टाइम्स नाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ‘आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की आपला स्तर काय आहे? आपण ट्रेंडच्या कृपेवर जिवंत आहोत का? नाही, मी कोणत्याही कलेला त्या दृष्टीकोणातून पाहत नाही. आपण एका अॅपच्या जीवावर आहोत जो ठरवेल की कोण आपला शो पाहणार आणि कोण पाहणार नाही? अजिबात नाही. मला नाही वाटत या गोष्टीचा फरक पडत असेल’ असे त्याने म्हटले होते.

पुढे त्याने म्हटले की मी आतापर्यंत कधीच शेतकऱ्यांशी संबंधीत गोष्टी मी कधीही ट्रेंडमध्ये पाहिल्या नाहीत. मला असे वाटते लोकांनी आता ट्रेंडवर विश्वास ठेवण्यापेक्षा बाकी इतर गोष्टींवर ठेवावा. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकॉट अली फजल आणि बॉयकॉट मिर्झापूर २ हे ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

दरम्यान अली फजल आणि सीरिजचा निर्माता फरहान अख्तरने सीएए आणि एनआरसी सारख्या मुद्द्यांवर आवाज उठवला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना आता ट्रोल केले जात असल्याचे देखील म्हटले जात आहे.

मिर्झापूर ही गाजलेली वेबसीरिज आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहे. २३ ऑक्टोबरपासून मिर्झापूर 2 अर्थात या वेबसीरिजचा दुसरा सिझन भेटीला येतो आहे. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:48 pm

Web Title: trend on tweeter ban ali fazal avb 95
Next Stories
1 कंगनाविरोधात FIR दाखल करा; कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
2 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे चित्रपट गमावावे लागले, अभिनेत्रीचा खुलासा
3 साराच्या NCB चौकशीनंतर इब्राहिमने केली पहिली पोस्ट, म्हणाला…
Just Now!
X