‘आयुष्यात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काही लोक फार तत्पर असतात. त्यांच्या मते, आयुष्याचा प्रवास हा यातूनच पुढे जात असतो’. अशाच कृष्णा सुर्वेची हटके मनोरंजक कथा संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटात बघायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या भन्नाट टीजर वरून लक्षात येते. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणाऱ्या ‘ट्रिपल सीट’चा टीजर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे.

अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेता अंकुश चौधरी हा हात जोडत मी कृष्णा सुर्वे अशी स्वतःची ओळख करून देत, आपण आयुष्याच्या प्रवासातील एक प्रवासी असून आपली स्टेअरिंग वरच्याच्या हातात असल्याचे सांगतो. शिवाय, हे सांगताना तो चोरून कुणाच्या तरी घरात शिरून काही तरी शोधत असल्याचे दिसते. तसेच एका अंधाऱ्या खोलीत बसलेली एक तरुणी कृष्णाला कॉल करून मदत करण्याची विनंती करतेय. ही तरुणी नेमकी कोण आहे? आणि कृष्णा तिची मदत करणार का? याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

नुकतीच मराठी बिगबॉस मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे चित्रपटाच्या टीझरमध्ये पावसाच्या प्रत्येक थेंबाला स्वतःच एक गाणं असतं असं सांगत, ते ऐकत पावसात चिंब भिजताना आपल्या दिसते. शिवाय फोनवर ती अंकुश बरोबर गप्पा मारताना खळखळून हसताना दिसते. तर त्याचवेळी अभिनेत्री पल्लवी पाटील अंकुशाचा हात पकडताना दिसते यामुळे ‘ट्रिपल सीट’ मध्ये नक्की काय ट्वीस्ट आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा वाढली आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत.

नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत. तगडी स्टारकास्ट आणि अनुभवी तंत्रज्ञ असलेला ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.