‘मनमर्झिया’ चित्रपटातून नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिषेक बच्चनला पुन्हा एकदा टोलर्सचा सामना सोशल मीडियावर करावा लागला आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आणि चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणाऱ्या अभिनेत्यापैकी एक म्हणून अभिषेक ओळखला जातो. अनेकदा प्रश्न विचारून त्याला टोलर्सनं कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण या प्रश्नांना तितक्याच संयमीपणे आणि स्वत:ची पातळी न ओलांडता अभिषेकनं उत्तर दिलं आहे.

‘मनमर्झिया’तील भूमिकेवरून एका ट्विटर युजरनं पुन्हा एकदा अभिषेकवर निशाणा साधला आहे. लागोपाठ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर आता अभिषेकनं अभिनय सोडून वडापाव विकायला सुरूवात केली पाहिजे अशा शब्दात एकानं अभिषेकवर टिका केली आहे. अभिषेकनं लागोपाठ फ्लॉप चित्रपट दिले आहेत, फ्लॉप चित्रपट देण्याचं कौशल्य फार कमी लोकांकडे असतं असा टोलाही एका युजर्सनं लगावला आहे.

हा युजस एक डॉक्टर असल्याचं समजल्यावर अभिषेकनं त्यालाही सणसणीत टोला आपल्या ट्विटमधून लगावला आहे. चित्रपटाचं आर्थिक गणित आधी तुम्ही समजून घ्या. तुमच्यासारख्या डॉक्टरानं कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवून मगच त्यावर भाष्य केलं पाहिजे नाहीतर चारचौघात हसं होण्याची वेळ तुमच्यावर येईल असंही अभिषेक म्हणला.  ‘मनमर्झिया’ हा चित्रपट फ्लॉप गेला नाही. फार कमी बेजटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे पण, चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेनं चित्रपटानं खूप चांगली कमाई केली असं अभिषेकनं म्हणत ट्रोल करणाऱ्याला उत्तर दिलं आहे.