News Flash

जॅक स्नायडरच्या ‘जस्टिस लीग’मागील खरी कथा; चाहत्यांच्या चळवळीपुढे निर्माते झुकले

चार वर्ष चाहत्यांनी केलं होतं आंदोलन

(Photo: Warner Bros)

गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये उत्सुकता होती ती म्हणजे जॅक स्नायडरच्या ‘जस्टीस लीग’ या सिनेमाची. चाहत्यांच्या मागणीनंतर अखेर चार वर्षांनी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आलाय. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा गेल्या काही वर्षांमध्ये चांगलाच चर्चेत राहिला आहे. तसचं दिग्दर्शक जॅक स्नायडर आणि वॉर्नर ब्रदर्स स्टुडीओ यांच्यातील मतभेदांमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

खरं तर 2017 मध्ये ‘जस्टिस लीग’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र यावेळी जॅक स्नायडर यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रदर्शित न करता जॉश विडन यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा वार्नर ब्रदर प्रोडक्शनने प्रदर्शित केला. यामुळे स्नायडरच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. जवळपास 4 वर्ष चाहत्यांनी जॅकने दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रदर्शित करण्याची मागणी केली. अखेर चार वर्षांनी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून ‘जॅक स्नायडर्स जस्टिस लीग’ असं या चित्रपटाला नाव देण्यात आहे.

अनेकांचा विश्वास बसणार नाही मात्र या सिनेमाच्या निर्मितीसाठी कंपनीने  70 दशलक्ष डॉलर पुन्हा खर्च केले. ‘जोकर’ आणि ‘डेडपूल’ यासारख्या कॉमीक बुकवर आधारित मोठ्या सिनेमांच्या बजेटच्या तुलनेत हा खर्च कितीतरी पटीने जास्त आहे. जो फक्त दिग्दर्शकाच्या कटवर करण्यात आला आहे.

का होत होती स्नायडर कटच्या प्रदर्शनाची मागणी?
2017 मध्ये ‘जस्टीस लीग’ आल्यापासून स्नायडरच्या चाहत्यांनी मूळ स्वरुपातील ‘जस्टीस लीग’  रिलीज करण्याच्या मागणीवर जोर धरला. काही कौटुंबिक कारणांमुळे जॅक स्नायडरला या सिनेमाचं दिग्दर्शन अर्ध्यातच सोडावं लागलं होतं. जॅकने दिग्दर्शन सोडल्यानंतर सिनेमाची पटकथा लेखन करणाऱ्या जॉश विडन यांनी दिग्दर्शनाची सुत्रू हाती घेतली ;असं सांगितलं जात असलं. तरी सत्य काही वेगळं आहे. मुळात जॅक स्नायडर या सिनेमाचं दिग्दर्शन करत असतानाचं या प्रोजेक्टमध्ये जॉश विडेनची एण्ट्री झाली होती. निर्मात्यांना जॅकचं काम पसंत नव्हतं. त्यामुळे एकाच सेटवर दोन दिग्दर्शक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. डीसीकडून जॅक स्नायडरच्या कल्पनांना चुरडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे प्रदर्शित झालेल्या सिनेमात विडेनचा प्रभाव जास्त दिसून आला. स्नायडरच्या चाहत्यांना ही बाब चांगलीच खटकली. परिणामी हा सिनेमा फ्लॉप ठरला. प्रदर्शित झालेला सिनेमा अगदी वाईट नव्हता मात्र एवढी मोठी नामांकित स्टार कास्ट असल्याने तो अधिक उत्कृष्ट बनू शकला असता. तसंच स्नायडरने चित्रीत केलेले अर्ध्याहून अधिक फुटेज देखील काढून टाकण्यात आलं होतं.

ख्रिस्तोफर नोलन आणि स्नायडरच्या पत्नीने एका प्रायव्हेट स्क्रिनिंगमध्ये जेव्हा हा विडनचा कट असलेला सिनेमा पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. ” तो सिनेमा तू कधीच पाहू शकत नाही.” असं ती स्नायडरला म्हणाली. कारण तो कट पाहून त्याचा भ्रमनिरास झाला असता हे तिला ठाऊक होतं.

मुळात जॅक स्नॅयडरचा ‘जस्टिस लीग’ सिनेमा बनवण्याचा प्लान वेगळा होता. त्या दृष्टीनेच त्याने सिनेमाचं शूटिंग केलं होतं. मात्र त्याच्या दत्तक मुलीने आत्महत्या केल्याने त्याला काम थांबवावं लागलं. जेव्हा प्रेक्षकांना हे कळालं तेव्हा त्यांनी स्नायडरने बनवलेला सिनेमा पाहण्याची मागणी केली. 2017 पासून चाहते ही मागणी करत होते. काही जणांना असंही वाटलं कि स्नायडर कट सारखं काही अस्तित्वातच नाही आणि असलं तरी डीसी ते प्रदर्शित नाही करणार. मात्र 2020 मध्ये डीसीने अधिकृतरित्या स्नायडर कट अस्तित्वात असल्याच सांगितलं. तसचं तो जवळपास पूर्ण झाल्याचंही जाहीर केलं. यासाठी काही नवीन फुटेज शूट करण्यात आलं तर काही जुन्या फुटेजला व्हिज्युअल इफेक्ट देऊन बदलण्यात आलं. आणि यावर पुन्हा 70 दक्षलक्ष डॉलर खर्च करण्यात आले. मुख्य म्हणजे स्नायडर कट वर नव्याने  काम करत असताना जॅक स्नायडरने काहीच पैसै घेतले नाही. कामाबद्दलची आत्मियता, चाहत्याचं प्रेम आणि मुलीसाठी त्याने सर्व काम मोफत केलं.

विडनचा कट असलेला सिनेमा पाहिल्यानंतर स्नायडरच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून चळवळ उभी केली. या चळवळीनंतर डीसीने स्वत:च हित साधत चाहत्यांना हवं ते देण्याचा निर्णय घेतला. एचबीओ मॅक्सवर स्नायडर कट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. चाहत्यांचं समाधान करण्यासोबतच वार्नर ब्रदर्सच्या एचबीओ मॅक्सची देखील जाहिरात होईल आणि युजर वाढतील असा यामागचा खरा हेतू होता.

प्रदर्शित करण्यात आलेला ‘जस्टीस लीग’ सिनेमा साधारण 2 तासांचा होता. तर झॅक स्नायडरचा मूळ कट साडे चार तासांचा आहे. भारतामध्ये हा सिनेमा प्ले, हंगामा प्ले, टाटा स्काय अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपल्बध आहे. मात्र यासाठी जवळपास 150 ते 200 रुपये मोजावे लागतील. शिवाय सध्या तरी हा सिनेमा फक्त इंग्रजीत पाहता येणार आहे. तीन महिन्यांनंतर प्रेक्षकांना हिंदी डब सिनेमा पाहता येईल.
स्नायडरने या आधी ‘300’, ‘लेजंड ऑफ द गार्डियन’, ‘मॅन ऑफ स्टील’, अशा सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 3:54 pm

Web Title: true story behind zack snyder justice league how fan fought for movie kpw 89
Next Stories
1 “मला मिलिंद सोमणच हवा” असा हट्ट तिने केला आणि इतिहासच घडला….
2 अखेर ‘चेहरे’मधील रियाचा लूक आला समोर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
3 ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पडला होता करण जोहर
Just Now!
X