20 January 2021

News Flash

‘जर मी करिश्माला कॉपी करण्याचा प्रयत्न….’, कुली नं. १मधील भूमिकेविषयी साराचा खुलासा

कुली नं. १ चित्रपटात सारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नव्वदच्या दशकात गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनने त्याचा रिमेक करण्यात निर्णय घेतला होता. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता साराने आयएएनएस दिलेल्या मुलाखतीत करिश्माची भूमिका साकारणे कठिण असल्याचा खुलासा केला आहे.

“करिश्मा कपूरची जागा घेणं खूप कठीण आहे. ती एक आयकॉनीक स्टार आहे. करिश्माने नव्वदचे दशक गाजवले होते. या चित्रपटात मी तिची जागा घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. हा कुली नं. १ चित्रपटाचा रिमेक असल्यामुळे आमच्या दोघींची तुलना ही टाळता येणार नाही. या चित्रपटात काही तरी नवीन करण्याचा मी प्रयत्न केला आहे” असे सारा म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “इतक्या वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदल्या आहेत. करिश्माला कॉपी करण्यापेक्षा, चित्रपटात काही तरी वेगळ करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला वरुणसोबत काम केल्याचा आनंद आहे. जर मी करिश्माला कॉपी करण्याचा प्रयत्न केला असता तर माझी आणि वरुणची केमिस्ट्री एवढी उठून दिसली नसती. म्हणून आम्ही करिश्माला कॉपी केलेलं नाही.”

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 4:50 pm

Web Title: trying to copy karisma kapoor is impossible said sara ali khan dcp98 avb 95
Next Stories
1 ‘बायकोला हवं तरी काय?’; वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच दिसणार श्रेया बुगडेचा नवा अंदाज
2 १२ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराशी गौहर खान ‘या’ दिवशी करणार लग्न
3 महानायकाचा स्वॅग; बिग बींनी शेअर केला कधीही न पाहिलेला तरुणपणीचा फोटो
Just Now!
X