28 September 2020

News Flash

आता हे काय नवं नाटक; प्रशांत दामलेंना प्रसाद ओकने नाकारली भूमिका

प्रशांत दामले म्हणाले 'तू म्हणशील तसं'.

मराठी रंगभूमीवर सतत विविध प्रकारचे प्रयोग होत असतात. अनोखे विषय असलेली नाटके प्रेक्षकांच्या भेटीस येतात. असेच एक नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकाचा टिझर व्हायरल झाला असुन त्यात प्रसाद ओक प्रशांत दामले यांना भूमिकाच नाकारताना दिसतोय. तू २२ वर्षांचा वाटतोस त्यामुळे तू नकोच असं प्रसाद ओक म्हणतो आणि त्यावर प्रशांत दामले म्हणतात ‘तू म्हणशील तसं’.
मराठी अभिनयसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि प्रसाद ओक या नाटकात प्रमुख भूमिका सादर करताना दिसणार आहेत. या नाटकाचे नावच आहे ‘तु म्हणशील तसं’.

नाटकाची कथा काय?, इतर कलाकार कोण आहेत? व हे नाटक कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जाहीर केली गेलेली नाही. प्रसादने नुकतेच मराठी रंगभूमी दिनानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर करुन या नाटकाबाबत प्रेक्षकांना माहिती दिली.

प्रसादने अलिकडेच ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकांमध्ये काम केले होते तर प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजतेय. या दोघांकडेही अभिनयाचा प्रचंड अनुभव आहे. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे प्रेक्षक आता ‘तु म्हणशील तसं’ या आगामी नाटकाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 7:48 pm

Web Title: tu mhanshil tasa new marathi natak prashant damle prasad oak mppg 94
Next Stories
1 ‘हा’ मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार रुपेरी पडद्यावर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा
2 Tanhaji The Unsung Warrior : कोंढाण्यावर ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, तुम्हाला माहिती आहे?
3 रानू यांचा तो भयंकर मेकअप करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट होत्या तरी कोण?
Just Now!
X