‘तुझं माझं जमतंय’ या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करतेय आणि यावेळी ती एकदम ठसकेदार ‘पम्मी’ या व्यक्तिरेखेसोबत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे प्रेक्षक या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. अपूर्वाच्या या मालिकेतून मोनिका बागुल छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
अपूर्वा नेमळेकर सोबत या मालिकेत रोशन विचारे आणि मोनिका बागुल हे दोघे या मालिकेत प्रमुख भूमिका निभावताना दिसणार आहेत. मोनिका या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करतेय. मोनिकाला मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
मोनिकाच्या पदार्पणाविषयी आणि मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना मोनिका म्हणाली, “तुझं माझं जमतंय या मालिकेत मी अश्विनी नवले हि व्यक्तिरेखा साकारते आहे. अश्विनी हि खूपच साधी, सरळ, हळवी आणि चुलबुली आहे. तिचं आयुष्य तिची आई, तिची बहीण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातील टीव्ही याभोवती फिरतं. टीव्हीवर लागणाऱ्या मालिकांमध्ये जे घडतं तसंच खऱ्या आयुष्यात देखील घडतं असा अश्विनीचा समज आहे. टीव्ही हा अश्विनी आणि तिच्या आईच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. पदार्पणातच मला अशी भूमिका आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळतंय याचा मला आनंद आहे आणि प्रेक्षकांना अश्विनी नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 6:56 pm