News Flash

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये नवे वळण, राणादाचा मेकओव्हर?

या मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी चॅनेलवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. मालिकेतील पहिलवान गडी राणादाचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता या सर्व गोष्टींचा खुलासा झाला आहे.

‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकने त्यावर बोलणे टाळले आहे. परंतु ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत असे काही घडणार नसल्याचे चॅनेलचे म्हणने आहे. दरम्यान, या मालिकेत आणखी अनेक वेगळी वळणे येणार असल्याचे देखील म्हटले आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन मालिकेत राणा दाचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात आहे. राणाचा मृत्यू हा चाहत्यांसाठी धक्काच असणार आहे. आता राणा दा पुन्हा मालिकेत दिसणार की नाही किंवा त्याच्या जागी दुसरा कोणता कालाकार दिसणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडला होता.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली असून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी चॅनेलवर प्रदर्शित होते. या मालिकेत हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (पाठक बाई ), छाया सानगावकर (गोदाक्का), धनश्री काडगावकर (नंदिता), राज हानचांगले (सनी दा), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनावणे (चंदा) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 11:05 am

Web Title: tujhat jiv rangala serial rana da make over avb 95
Next Stories
1 कॉलेजमधील विद्यार्थ्याची भूमिका साकारताना घाबरलो होतो – शाहिद कपूर
2 आमिरच्या ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये झळकणार करीना?
3 अक्षय विरुद्ध प्रभास: १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार ‘हे’ दोन मोठे चित्रपट
Just Now!
X