11 August 2020

News Flash

Tujhyat Jeev Rangala : ​’तुझ्यात जीव रंगला’च्या चित्रीकरणामधील काही भाग लीक

राणादा आणि मनजीत यांच्यामध्ये अटीतटीचा कुस्ती सामना रंगणार आहे.

तुझ्यात जीव रंगला

‘चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना राणाने वेड लावलंय. शरीराने जरी दांडगा पहिलवान असला तरी मनाने अतिशय साधा सरळ असलेल्या राणाच्या या स्वभावामुळेच अंजलीही त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांचं लग्नही झालं. पण, त्यांच्या लग्नाच्या प्रेमात त्यांना बऱ्याच अडथळ्यांना तोंड द्यावे लागतं आहे.

वाचा : अरेच्चा, ही तर स्वानंदी!

राणाच्या पायाची काळजी असतानाच दलजीत नावाचा बलाढ्य कुस्तीपटू आता त्याच्यासमोर येऊन ठाकला आहे. त्यामुळे वज्रकेसरीसाठी रणविजय गायकवाड उर्फ राणादा आणि दलजीत यांच्यामध्ये अटीतटीचा कुस्ती सामना रंगणार आहे. मात्र, या विशेष भागाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जवळपास दीड-दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे

वाचा : दोन वर्षांपूर्वी अशी दिसायची ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचा एक विशेष भाग २६ नोव्हेंबरला दाखवण्यात येणार आहे. त्याची जोरदार प्रसिद्धीही केली जातेय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये या भागाच्या चित्रीकरणावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. जवळपास दहा हजार लोक चित्रीकरण बघण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी कोणीही मोबाईल वापरु नये अथवा व्हिडिओ काढू नये अशा सूचना देण्यात होत्या. मात्र, तरीही काही माणसे प्रेमापोटी फोटो किंवा व्हिडिओ काढत होते. पण मालिकेचा भाग किंवा मुख्य दृश्य लीक झाले नसल्याचे मालिकेचे लेखक आणि क्रिएटिव्ह हेड सुबोध खानोलकर यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला सांगितले.

राणा जिंकणार किंवा हरणार यापेक्षा त्याच्यासोबत या सामन्यात काय होणार याची जी कथा आणि त्यातील वेगवेगळ्या घटना लीक झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये असलेली उत्सुकता अजून टिकून आहे. सेटवरील व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी कलाकारांमध्ये अजिबात तणावाचे वातावरण नाही. कारण  काहीही झाले तरी प्रेक्षक हे सर्व प्रेमापोटी करतात याची संपूर्ण टीमला जाणीव आहे. पण, मोबाईल वापरू नका अशी सूचना दिल्यानंतर प्रेक्षकांनी कृपया तसे वागावे अशी विनंतीही सुबोध यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2017 10:24 am

Web Title: tujhyat jeev rangala special episode leak whole team in tenssion
Next Stories
1 मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही ‘पद्मावती’वर बंदी
2 अरेच्चा, ही तर स्वानंदी!
3 नाटक-बिटक : ‘रंगसंगीत एकांकिका स्पर्धा’ नवीन रंगभाषा घडवतेय
Just Now!
X