झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. वय विसरायला लावणारी विक्रांत सरंजामे आणि इशा निमकरची ही जगावेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. या मालिकेत काय नवीन वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. विक्रांत इशाला प्रपोज करणार असून त्याचा महाएपिसोड रविवारी प्रसारित होणार आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये या महाएपिसोडची झलक पाहायला मिळाली.

इशाचं मन जिंकण्यासाठी, प्रपोज करण्यासाठी विक्रांतने तिला कर्जतच्या बंगल्यावर बोलावलं आहे. या खास दिवसासाठी त्याने खास तयारीसुद्धा केली आहे. संपूर्ण बंगला त्याने फुलांनी सजवला आहे. यासोबतच त्याने इशासाठी एक खास सरप्राइज प्लॅन केला आहे. त्याचा खुलासा अद्याप निर्मात्यांनी केला नाही. विक्रांत इशाला हॅलिकॉप्टर सफरीवर घेऊन जाणार आहे. याची संपूर्ण शूटिंग ड्रोनद्वारे होणार आहे. हॅलिकॉप्टर सफरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/BrHVAgAhT05/

https://www.instagram.com/p/BrHpgWrBCAP/

वाचा : बिग बींनी मानले नागपूरकरांचे आभार

हा एक तासाचा महाएपिसोड रविवारी रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. विक्रांत कशा पद्धतीने त्याचं प्रेम व्यक्त करणार आणि इशा ते स्विकारणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.