छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या टीमची नुकतीच फेअरवेल पार्टी पार पडली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुबोध भावे, गायत्री दातारसह मालिकेतील सर्व कलाकार, तंत्रज्ञ या पार्टीला उपस्थित होते.
फेअरवेलनिमित्त सुबोधने मालिकेच्या सर्व कलाकारांना एक छोटी भेटसुद्धा दिली. मालिकेत कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांच्या चित्राची फ्रेम सुबोधने त्यांना भेट म्हणून दिली. ही फ्रेम हातात घेऊन कलाकारांनी पार्टीत डान्स केला. ‘झिंगाट’ गाण्यावर सुबोध व गायत्रीसुद्धा थिरकले.
आणखी वाचा : अभिनयापूर्वी बोमन इराणींनी ताज हॉटेलमध्ये केलं होतं वेटरचं काम
अभिनेत्री शिल्पा तुळसकरने ‘तुला पाहते रे’ मालिकेत राजनंदिनीची भूमिका साकारली होती. तिनेही सोशल मीडियावर फेअरवल पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. ‘खूप छान प्रवास होता,’ असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. जुलैच्या अखेरपर्यंत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल अशी माहिती सुबोधने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर गायत्रीनेही या वृत्ताला दुजोरा दिला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2019 1:13 pm