18 October 2019

News Flash

‘तुला शोधते रे’ : गुगलवर राज ठाकरेंपेक्षा राजनंदिनीची जास्त क्रेझ

सोशल मीडियावरही 'तुला पाहते रे' मालिकेची जोरदार चर्चा असते. इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही या मालिकेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनासुद्धा मागे टाकलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे आणि इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं. या मालिकेच्या कथेमध्ये मोठा ट्विस्ट आला असून. नुकतीच राजनंदिनीची या भूमिकेची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारणार असून सोशल मीडियावरही ‘तुला पाहते रे’मधील राजनंदिनीची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही या मालिकेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनासुद्धा मागे टाकलं आहे.

ही मालिका केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात यांसारख्या राज्यांतही लोकप्रिय आहे.

गूढ आणि थराराने परिपूर्ण अशा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र नाईकांनाही सरंजामेंनी मागे टाकलं आहे.

झी मराठी वाहिनीवरीलच ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रमसुद्धा खूप गाजतो. या कार्यक्रमातील भाऊ कदमसुद्धा लोकप्रिय कलाकार आहे. पण कार्यक्रम आणि भाऊ कदम या दोघांनाही ‘तुला पाहते रे’ मालिकेने गुगल ट्रेण्ड्समध्ये मागे टाकलं आहे.

‘तुला पाहते रे’मध्ये नुकतीच राजनंदिनीची या भूमिकेची एण्ट्री झाली आहे. मालिकेच्या टीझरमध्ये तिची झलक पाहायला मिळाली होती. पण आतापर्यंत मालिकेत तिची एण्ट्री झाली नव्हती. मालिकेत तिच्या येण्याने आणखीनच लोकप्रियता वाढली आहे.

First Published on April 25, 2019 11:40 am

Web Title: tula pahate re serial in google trends as against raj thackeray and ratris khel chale