छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने काही दिवसापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेल्या सुबोध भावेला आणि इशा निमकरची भूमिका साकारलेल्या गायत्री दातारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. भूमिकेला न्याय देण्यासाठी या कलाकारांनी विशेष मेहनतही घेतली होती. त्यामुळे या कलाकारांना मानधनही त्याचप्रमाणे मिळालं. मात्र सुबोध भावेने मात्र या मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सुबोध हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे, त्यामुळेच त्याचं मानधन हे सर्वात जास्त असल्याचं दिसून येतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘तुला पाहते रे’च्या प्रत्येक एपिसोडमागे सुबोधला ३५ हजार रुपये मानधन मिळत होते. विशेष म्हणजे सुरुवातीला ही मालिका केवळ २०० ते २५० भागांमध्ये संपविण्यात येणार होती. मात्र प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून या मालिकेचे भाग वाढविण्यात आले. त्यानंतर या मालिकेने ३०० भाग पूर्ण केले.

वाचा : ‘तुला पाहते रे’च्या निरोपानंतर सुबोध भावे म्हणतो…

दरम्यान, विक्रांत सरंजामे या भूमिकेला सुबोधने पुरेपूर न्याय दिला असून त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. त्यामुळेच ही भूमिका विशेष गाजली. त्यातच विक्रांत सरंजामे या भूमिकेला सुबोध भावेच न्याय देऊ शकतो, असा विश्वास निर्मात्यांना होता. त्यामुळेच त्यांनी विक्रांत सरंजामेसाठी सुबोधला विचारणा केली होती.