थरार आणि गूढने परिपूर्ण अशी कथा घेऊन अभिनेता सोहम शाह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तुंबाड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आनंद एल राय निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक कुटुंब तुंबाड हे गाव सोडून जात असताना या ट्रेलरची सुरुवात होते. ‘सरकार मर गया’ (सरकार मेला) असं ते बोलत असतात. जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमधून चित्रपटाची कथा समजून येते. गावातील अशी एक जागा जिथे खजिना लपवून ठेवला आहे आणि त्या कुटुंबातील एक मुलगा तो शोधण्यासाठी धडपड करत असतो. या खजिन्याच्या शोधात असणाऱ्या गावातील बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो. एक भूत त्या खजिन्याचं रक्षण करतोय असा समज गावकऱ्यांमध्ये असतो. ‘वारशाने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर दावा करायचा नसतो,’ असा संवाद या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो. ट्रेलरमधील एकंदरीत संवाद आणि दृश्ये पाहता प्रेक्षकांची घाबरगुंडी नक्कीच उडेल.

वाचा : तुम्हाला माहित आहे का? युवराज सिंगच्या पत्नीने ‘हॅरी पॉटर’मध्येही केलंय काम

‘तुंबाड’ची कथा ही १९२०च्या काळाताली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. त्यामुळे एकंदरीत या थरारपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वेनं केलं आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची बहुतांश शूटिंग ही महाराष्ट्रातच झाली आहे. महाराष्ट्राशी चित्रपटाच्या कथेचा संबंध असल्याने १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठीत प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tumbbad trailer released sohum shah film is a tale of unabashed greed
First published on: 25-09-2018 at 13:27 IST