21 November 2017

News Flash

Tumhari Sulu Teaser: विद्या बालन म्हणते, ‘हॅलो… मैं सुलु बोल रही हूँ!’

या सिनेमात रेडिओवर रात्री उशिरा तिचा कार्यक्रम प्रसारित होत असतो

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 8:02 PM

विद्या बालन

‘लगे रहो मुन्नाभाई’मधील ‘गुड मॉर्निंग मुंबई’ असे म्हणणाऱ्या अभिनेता विद्या बालनला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. देशभरातील प्रेक्षक तिच्या प्रेमातच पडले होते. त्याच अंदाजात विद्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. रेडिओ जॉकी बनून ‘हॅलो, मैं सुलु बोल रही हूँ!’ असे म्हणणार आहे. आगामी ‘तुम्हारी सुलु’ या सिनेमात तिचा हा मधुर आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात ती रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अदाकारीने प्रेमात पडलेले प्रेक्षक तिचा आवाज ऐकण्यासाठी हा टीझर पुन्हा-पुन्हा पाहतील, यात शंकाच नाही.

या सिनेमात ती रेडिओ जॉकीच्या भूमिकेत आहे. रेडिओ जॉकी म्हटल्यावर प्रसंगानुरुप आवाजातील चढ-उताराचा सराव करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सुलोचना अर्थात सुलु आपल्या आवाजात चढ-उतार कसा हवा, याचा सराव करत असल्याचे या टीझरमध्ये दिसते. एका मिनिटाचा हा टीझर आहे. त्यात विद्याची खोडकर बाजू आपल्याला पाहायला मिळत आहे.

या सिनेमात रेडिओवर रात्री उशिरा तिचा कार्यक्रम प्रसारित होत असतो. या कार्यक्रमासाठी ती मादक आवाज काढण्याचा सराव करत असते. त्याचवेळी तिच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक तिच्याकडे एकटक पाहतात. साध्या, सरळ स्वभावाची, साडी नेसणाऱ्या सुलुकडे पाहून ती मादक आवाजात बोलू शकते, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. उंच भरारी घेण्यासाठी पंखांचीच गरज असते असे नाही, अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. या सिनेमातील विद्या बालनला पाहून ही टॅगलाईन किती समर्पक आहे हे समजते.

या सिनेमातही विद्या साडीमध्ये खुपच सुंदर दिसते. ‘तुम्हारी सुलु’मधील भूमिकेविषयी विद्या भरभरून बोलली आहे. ‘सुलू ही लिंबाप्रमाणे आहे. कोणत्याही पदार्थात लिंबाचा रस मिसळल्यावर त्या पदार्थाची चव छान होते, तशीच माझी ही भूमिका आहे. माझ्या मते सुलुच्या निमित्ताने माझ्यातील खोडकर विद्या सर्वांसमोर येणार आहे, असे तिने सांगितले. याआधी ‘बेगम जान’ हा विद्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला होता.

First Published on September 14, 2017 1:47 pm

Web Title: tumhari sulu teaser vidya balan sensuous voice watch video