News Flash

‘तुर्रम खान’साठी राजकुमार राव- नुशरत भरुचा आले एकत्र

#TurramKhan अजय देवगण या चित्रपटाचा निर्माता तर लव रंजन सहनिर्माता आहे.

'तुर्रम खान' चित्रपटात झळकणार राजकुमार- नुशरतची जोडी

 दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा राजकुमार राव दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘तुर्रम खान’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अभिनेत्री नुशरत भरुचा राजकुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या कॉमेडी चित्रपटाचे निर्माते अजय देवगण, लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत.

राजकुमार आणि हंसल मेहता यांचा हा पाचवा चित्रपट असेल. याआधी ‘शाहिद’, ‘अलिगढ’, ‘सिटीलाइट्स’ आणि ‘ओमर्ता’ या चार चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं. विशेष म्हणजे ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून राजकुमार आणि नुशरतने एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. लव रंजनच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये नुशरतने भूमिका साकारली असून त्या भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता राजकुमार- नुशरतची ही नवी जोडी पडद्यावर काय धमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Stree box office collection: ‘स्त्री’ची १०० कोटींकडे वाटचाल

राजकुमार राव याविषयी म्हणतो, ‘माझं करिअर उभं करण्यामागे हंसल मेहता यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि नुशरतला मी माझ्या स्ट्रगलिंगच्या काळापासून ओखळतो. ऑडीशन आणि स्क्रिन टेस्टसाठी बऱ्याचदा आम्ही भेटायचो. त्यामुळे आमची ही जोडी प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल असा मला विश्वास आहे.’

‘तुर्रम खान’ या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्या गावातली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 12:39 pm

Web Title: turram khan rajkummar rao and nushrat bharucha to star in hansal mehta comedy film
Next Stories
1 ‘हेमा मालिनी माझी आई असती तर..’
2 Stree box office collection: ‘स्त्री’ची १०० कोटींकडे वाटचाल
3 …म्हणून छोटी भूमिका असूनही दिशानं दिला चित्रपटाला होकार
Just Now!
X