01 March 2021

News Flash

तुषार कपूर का झाला भावूक ?

२०१६ मध्ये सरोगसी पद्धतीने लक्ष्यचा जन्म झाला होता.

‘मुझे कुछ कहे ना है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा अभिनेता तुषार कपूर सध्या त्याच्या लाडक्या मुलासोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे. लग्नापूर्वीच बाबा झालेला तुषार त्याच्या लक्ष्यच्या संगोपनामध्ये व्यस्त असून तो आईप्रमाणेच लक्ष्यची काळजी घेत आहे. या कामामध्ये तुषारचे वडील जितेंद्र आणि बहीण एकता हेदेखील त्याला मदत करताना दिसून येतात. मात्र सध्या तुषारने इन्स्टाग्रामवर लक्ष्यच्या बालपणीचे फोटो शेअर करुन एक भावनिक पोस्ट लिहीली आहे.

तुषारचा लाडका लेक लक्ष्य दोन वर्षाचा झाल्यामुळे तुषारने लक्ष्यचे काही फोटो शेअर करुन एका पित्याच्या मनातील भावना व्यक्त केली आहे. ‘२०१६ मध्ये सरोगसी पद्धतीने लक्ष्यचा जन्म झाला होता. २ वर्षापूर्वी माझा हा गोड लाडू माझ्या आयुष्यात आला होता. या लहान पावलांच्या येण्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलंय. लक्ष्यच्या येण्यामुळे मला ख-या अर्थाने प्रेमाचा अर्थ समजला’, असं तुषारने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

पुढे तो असंही म्हणाला, एका मुलाचा पिता झाल्यामुळे मी फार आनंदी आहे. माझ्या आयुष्यात एक लहानसा जीव यावा असं मला कायमच वाटतं होते. लक्ष्यच्या येण्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली. तुषार कायमच लक्ष्यची काळजी घेताना दिसून येतो. अनेक वेळा तो शुटिंगच्या सेटवरही लक्ष्यला आपल्या बरोबर घेऊन जातो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:59 pm

Web Title: tushar kapoor shares lakshya newborn photo
Next Stories
1 बिग बींच्या आव्हानासमोर रणवीरनेही घेतली माघार
2 यंत्र आणि कामगार यांच्यातलं नातं अधोरेखित करणारा ‘लेथ जोशी’
3 एकता कपूरच्या ‘लैला-मजनू’चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X