‘गोलमाल अगेन’ २०१७ साली प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता तुषार कपूर हे नाव चित्रपटांमधून गायब झालं होतं. २०१६ मध्ये त्याने ‘आयव्हीएफ सरोगसी’द्वारे पितृत्व स्वीकारलं, त्यामुळे आपल्या मुलाच्या- लक्ष्यच्या संगोपनात रमलेला तुषार आता आपल्या कारकीर्दीची नवी इनिंग सुरू करतो आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा सहनिर्माता म्हणून तुषार कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे. गेली काही वर्षे अभिनेता म्हणून चित्रपटांपासून दूर असलो तरी लवकरच निर्माता आणि अभिनेता म्हणून आपण पुन्हा एकदा लोकांसमोर येणार असल्याचे तुषारने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘लक्ष्मी बॉम्ब’चा सहनिर्माता म्हणून तुषार अधिकृतपणे समोर आला असला, तरी या चित्रपटाच्या कथाकल्पनेपासून चित्रीकरणापर्यंतच्या सगळ्या प्रक्रि येत तो सहभागी होता. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘मुनी २ : कं चना’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. हा मूळ चित्रपट माझी सहकारी शबिनाने पाहिला होता, तिला तो आवडला. मलाही हा चित्रपट आवडला. हा चित्रपट हिंदीत करण्याचा विचार आमच्या मनात आला, मात्र रिमेकसाठी दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांच्याकडून हक्क मिळतील का? याची कल्पना नव्हती. आमचा बराचसा वेळ हा राघव लॉरेन्स यांना गाठण्यात गेला, पण त्यांना जेव्हा ही कल्पना सांगितली तेव्हा त्यांनीही लगेच होकार दिला आणि रिमेकचे हक्कही दिले. माझ्यासाठी तो सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता, असे तुषारने सांगितले. रिमेकचे हक्क मिळाल्यानंतर चित्रपटाच्या पटकथा लेखनाला सुरुवात झाली. त्यासाठीही आम्ही बराच वेळ घेतला. रिमेक असला तरी तो हिंदीत आणताना त्यासाठी योग्य पटकथा असणं गरजेचं होतं आणि जोवर मनाजोगती पटकथा लिहून होत नाही तोवर पुढे जायचे नाही, हे आम्ही पक्कं  ठरवलं होतं. या चित्रपटाची निर्मितीही मी आणि शबिनाने मिळून करायची ठरवली. माझ्या निर्मितीसंस्थेची सुरुवात या चित्रपटाने होते आहे, याचा मला आनंद आहे, असं तो म्हणतो.

करोनामुळे झालेली टाळेबंदी, गेले सात महिने बंद असलेली चित्रपटगृहे, चित्रीकरणांनाही लागलेला रोख या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्मी बॉम्ब’सारख्या मनोरंजक चित्रपटाचं येणं हे प्रेक्षकांना सुखावून गेलं आहे. अक्षय कु मारची मुख्य भूमिका आणि एकू णच ‘लक्ष्मी बॉम्ब’ची विनोदी, वेगळी मांडणी यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. चित्रपटावर काम सुरू झालं तेव्हा तो इतका लोकप्रिय होईल, असं वाटलं नव्हतं. या चित्रपटासाठी सगळ्या गोष्टी सहज जुळत गेल्या, असं तुषार सांगतो. रिमेकच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही राघव लॉरेन्स यांनीच स्वीकारली. त्याच दरम्यान अक्षय कु मारलाही ‘कं चना’ आवडला आहे आणि त्याला या चित्रपटात रस असल्याची माहिती मिळाली होती. त्याला ‘लक्ष्मी बॉम्ब’ची पटकथा ऐकवली, त्यालाही ती आवडली आणि त्याने तत्काळ होकार दिला. गेल्यावर्षी आम्ही चित्रीकरण के लं, मात्र त्याआधीपासून आम्ही चित्रपटाच्या प्रक्रियेत आहोत. मध्ये बराच काळ गेला आहे, पण आता ‘डिस्ने हॉटस्टार’सारख्या ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे, ही निर्माता म्हणून आपल्याला सुखावणारी गोष्ट असल्याचे तुषारने सांगितले. चित्रपट निर्मितीच्या पहिल्याच प्रयत्नात अक्षय कु मारसारखा मोठा कलाकार जोडला जाणं आणि यानिमित्ताने अक्षयबरोबर निर्मात्याच्या भूमिके तून एकत्र काम करणं हाही वेगळा अनुभव होता, असं तो सांगतो. कलाकार म्हणून तुम्ही एखादा चित्रपट करता तेव्हा तुम्ही बऱ्याचदा फक्त तुमच्या भूमिके पुरता विचार करता. निर्मात्याला तसं करता येत नाही. कथाकल्पनेपासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत निर्मात्यावर सगळी जबाबदारी असते. निर्मितीचा हा अनुभव खूप काही शिकवून गेल्याचे तो सांगतो. तुषारचे वडील अभिनेता जितेंद्र आणि बहीण एकता कपूर दोघेही यशस्वी निर्माता आहेत. निर्मितीचं क्षेत्र  त्याने जवळून पाहिलं असलं तरी ‘तुषार एन्टरटेन्मेट’ नावाने स्वत:ची निर्मितीसंस्था सुरू करणं ही नव्याने शिकण्याची प्रक्रिया असल्याचेही तो स्पष्ट करतो.

‘लक्ष्मी बॉम्ब’ यशस्वी ठरला तर त्याचा सिक्वलही येऊ शके ल, मात्र आत्ताच त्याबद्दल सांगणे कठीण आहे. एकदा हा चित्रपट प्रदर्शित झाला की मग मी निर्माता-अभिनेता म्हणून माझ्या दुसऱ्या चित्रपटावर अधिक लक्ष देऊ शके न. त्यावरही काम सुरू झाले आहे. निर्माता म्हणून नवी जबाबदारी आली असली तरी वडील म्हणून लक्ष्यबरोबर वेळ घालवणे, त्याचे संगोपन-शिक्षण यासाठीही प्राधान्याने वेळ देतो.

तुषार कपूर