20 November 2017

News Flash

प्रत्येक ‘गोलमाल’ सिनेमा करण्याची तुषार कपूरची इच्छा

गोलमाल या कॉमेडी सिनेमाचा अविभाज्य भाग बनलेला अभिनेता तुषार कपूर याने भविष्यात या चित्रपटाच्या

मुंबई | Updated: February 2, 2013 12:13 PM

गोलमाल या कॉमेडी सिनेमाचा अविभाज्य भाग बनलेला अभिनेता तुषार कपूर याने भविष्यात या चित्रपटाच्या सर्व सिक्वेलमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये.
२००६ मध्ये पहिल्यांदा रोहित शेट्टी यांनी गोलमाल चित्रपटाची निर्मिती केली. त्यावेळेपासून तुषार कपूर या चित्रपटात लकीची भूमिका साकारतो आहे. गोलमालचे त्यानंतर दोन सिक्वेल आले. गोलमाल रिटर्न्स आणि गोलमाल ३ या दोन्हीमध्येही तुषार कपूरने काम केले.
गोलमाल आणि त्याचे दोन्ही सिक्वेल प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. त्यामधील माझे कामही लोकांना भावले. एकूणच गोलमाल हा हिट फॉर्म्युला बनला आहे. त्याच्या तिन्ही भागांमध्ये मला काम करायला मिळाले, हे मी माझे भाग्यच समजतो. पुढेही गोलमालचे जितके सिक्वेल येतील. त्यामध्ये मला अभिनय करायला मिळेल, असे मला वाटते, असे मनोगत तुषार कपूरने व्यक्त केलंय.
गोलमालच्या चौथ्या सिक्वेलची निर्मितीची काही शक्यता आहे का, असे विचारल्यावर तुषारने रोहित शेट्टीच याबाबत नेमकेपणाने बोलू शकतील, असे म्हटले आहे. तुषार शूटआऊट ऍट वडाला या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याने एका गॅंगस्टरची भूमिका साकारली आहे.

First Published on February 2, 2013 12:13 pm

Web Title: tusshar kapoor wants to be part of every golmaal film