News Flash

जिजाचा भन्नाट स्वॅग! पाहा अक्षयाचा हटके व्हिडीओ

अक्षयाने शेअर केला हटके व्हिडीओ

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे अक्षया देवधर. उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षयाने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यातच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अलिकडेच अक्षयाने तिचा एक हटके व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं दिसून येत आहे. अंजली आता जिजा म्हणून गायकवाड कुटुंबात रहायला आली आहे. मात्र, तिचा लूक पूर्णपणे चेंज झाला आहे. याच मराठमोळ्या ठसकेबाज लुकमध्ये अक्षयाने तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओला तिने ‘जिजाचा स्वॅग’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये जोधा अकबर चित्रपटातील गाणं ऐकू येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

आणखी वाचा- शहनाज गिलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; मिळाले १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज

दरम्यान, अक्षया छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून कमी कालावधीत तिचा अफाट मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. अलिकडेच अक्षयाने तिचे पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले होते. तिच्या या लूकचीदेखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 11:41 am

Web Title: tuzyat jeev rangala fame akshaya deodhar new video jiza swag ssj 93
Next Stories
1 कार्तिकी गायकवाड अडकली विवाहबंधनात; प्राजक्ताने दिल्या शुभेच्छा
2 “कृषी कायदे रद्द केल्यास शेतकरी आणखी मागे जाईल”
3 सलमानचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा? भाईजानच्या ‘या’ फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X