News Flash

…या व्यक्तीमुळे अक्षया देवधर करतेय ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये काम

तो पहिल्या दिवसापासून माझ्या पाठीशी उभा आहे

अभिनेत्री अक्षया देवधर

छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाई या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतलाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठक बाईच्या नावाने वेगळी ओळख निर्माण केली. छोट्या पडद्यावर भोळ्याभाबड्या राणादाच्या प्रेमात पडलेल्या अक्षयाने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर दिसते.

या फोटोमध्ये तिच्या मागे ‘तुझ्यात जीव रंगला’चा लेखक सुबोध खानोलकरही उभा असलेला दिसतो. त्याच्या वाढदिवसाला अक्षयाने त्याच्यासाठी खास मेसेज लिहिला. इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबतचा एक ब्लर फोटो शेअर करत तिने म्हटले की, ‘फोटो ब्लर असला तरी सूचक आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मी करण्याला कारणीभूत असलेला व्यक्ती जो पहिल्या दिवसापासून माझ्या पाठीशी उभा आहे तो म्हणजे सुबोध खानोलकर. आज मी जे काही थोडे फार यश मिळवले त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.’

अक्षयाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेंट दिल्या. अक्षयाच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेविषयी बोलायचे तर ‘अंजली बाई’, ‘राणादा’ची निरागस प्रेम कहाणी सध्या एका वेगळ्या वळणावर प्रवास करते आहे. मालिकेच्या कथानकाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. टीआरपीमध्येही ही मालिका आघाडीवर आहे. या मालिकेने अभिनेता हार्दिक जोशी (राणा) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (अंजली पाठक) यांच्या अभिनय कौशल्यालाही दाद मिळते आहे. त्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 3:32 pm

Web Title: tuzyat jiv rangala actress akshaya deodhar shares her experience working with writer subodh khanolkar
Next Stories
1 BLOG : थ्री-डी स्वरुपातील ‘पद्मावती’च्या निमित्ताने…
2 ‘पद्मावती’च्या ‘क्लायमॅक्स’मधील दृश्य पाहिले का?
3 ‘या’ क्रिकेटरला भेटायला दुबईला गेली होती अर्शी खान, गहना वशिष्ठचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X