News Flash

“लव्ह यू बडी…”; ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादाने घातलं लाडक्या श्वानाचं वर्षश्राद्ध

अभिनेता हार्दिक जोशीने शेअर केले फोटो

(photo-facebook)

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील राणादा आणि पाठक बाई यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या दोघांना अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. या मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.

अभिनेता हार्दिक जोशी ने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. एका जीवाभावाच्या मित्राच्या आठवणीत त्याने ही पोस्ट शेअर केलीय. त्याचा खास दोस्त बडी याच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हार्दिकने काही फोटो शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा दिलाय. हार्दिकचा श्वान म्हणजेच बडी याच्या मृत्यू ला एक वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने हार्दिकने त्याचं वर्षश्राद्ध घातलं आहे. श्वानाच्या वर्षश्राद्धाचे आणि काही जुने फोटो हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या पोस्टमध्ये तो म्हणाला, “बडी तुला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं. तुझी कमी आजही आम्हाला जाणवते. तू कायम आमच्या बरोबर आहेस आणि कायम राहणार. लव्ह यू बडी ..माय बच्चा ..खूप खूप मिस यू.” या पोस्ट सोबत हार्दिकने त्याच्या श्वानांच्या वर्षश्राद्धाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये बडीच्या आवडीचे क्रीम बिस्कीट, आईस्क्रीम आणि इतर पदार्थ ठेवल्याचं दिसतंय.

हार्दिकच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत लाडक्या दोस्तासाठी श्रद्धांजली वाहिली आहे. तर अनेकांनी राणादाचं कौतुक केलं आहे. रांगड्या दिसणाऱ्या राणादाला मुक्या जनावरं प्रति असणार प्रेम पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 3:26 pm

Web Title: tuzyat jiv rangla fame ranada hardik joshi share his pet photo buddys death anniversary kpw 89
Next Stories
1 इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी ; इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं….
2 वडिलांच्या निधनानंतर अजुनही सावरली नाही हिना खान ; म्हणाली,”कुणाशी बोलायची इच्छा होत नाही..”
3 “त्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला”; श्रेयस तळपदेचा खळबळजनक खुलासा
Just Now!
X