28 September 2020

News Flash

टीव्ही अभिनेता करण सिंह ओबेरॉयला अटक, महिला ज्योतिषाने केला बलात्काराचा आरोप

पीडित महिलेने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती

संग्रहित छायाचित्र

टीव्ही अभिनेता करण सिंह ओबेरॉय याला एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. करणने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिला ज्योतिषाने केला होता. या प्रकरणी पीडित महिलेने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत करणला अटक केली आहे.

करणने बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं आणि पैसे उकळले असं पीडित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करुन चौकशी सुरू केली आहे.

ओशिवारा पोलीस स्थानकातील एफआयआरनुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. पीडितेने सांगितल्यानुसार, एक दिवस आरोपीने भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावलं. येथे आरोपीने लग्नाचं वचनही दिलं. यादरम्यान आरोपीने नारळ पाणी दिलं होतं, ते पाणी प्यायल्यानंतर थोड्याच वेळात तिला चक्कर आली. त्यानंतर आरोपीने बलात्कार केला आणि घटनेचा व्हिडिओही बनवला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्या व्हिडिओद्वारे आरोपी सातत्याने ब्लॅकमेल करत होता आणि पैसे उकळत होता आणि लग्नाबाबत विचारणा केल्यास केवळ टाळाटाळ करत होता. काही दिवसांपूर्वी मी लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने धमकी देऊन जे करायचं असेल ते कर असं म्हटलं. यानंतरच एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं पीडितेने सांगितलं.

दरम्यान, करण सिंह ओबेरॉयने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका केल्या असून ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून त्याला एक स्वतंत्र ओळख मिळाली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 1:40 pm

Web Title: tv actor karan oberoi arrested in connection of rape case
Next Stories
1 ‘सेक्रेड गेम्स २’च्या स्टारकास्टचे सिक्रेट संपले, हे दोन कलाकार येणार प्रेक्षकांच्या भेटीस
2 बिग बी – चाहत्यांच्या ‘एका रविवारची कहाणी’
3 जबरदस्त… ‘सुर्यवंशी’ अक्षयसोबत सिंघम, सिम्बाही झळकणार
Just Now!
X