02 March 2021

News Flash

‘मी स्वत:चा बॉस आहे’ म्हणत अभिनेत्याचा बिग बॉस १४ला नकार

लवकरच बिग बॉसचे १४ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ लवकरच हिंदी बिग बॉसचे १४वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बिग बॉस १४मध्ये कोणते कलाकार सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुकत आहेत. पण छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय कलाकाराने या शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉस १४मध्ये अभिनेता मिशेल रहेजा सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकताच मिशेलने या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ‘माझ्या बाबतीत या सर्व बातम्या ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मला कळत नाही अशा अफवा कुठून सुरु होतात. त्यांनी मला फेब्रुवारीमध्ये फोन केला होता हे खरं आहे. त्यावेळी चित्रीकरणामध्ये व्यग्र होतो. पण सध्या त्यांच्याशी माझे काही बोलणे झालेले नाही’ असे त्याने म्हटले आहे.

View this post on Instagram

Working still from #kumkumbhagya

A post shared by Mishal.Raheja (@mishal.raheja) on

त्यानंतर त्याला पुन्हा फोन आल्यावर बिग बॉसमध्ये सहभागी होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने ‘तो एक छान असा शो आहे. पण मला नाही वाटत मी सहभागी होऊ शकेल. माझ्यासाठी कोणीही बिग बॉस नाही. मी स्वत: माझा बॉस आहे’ असे मजेशीर अंदाजात तो म्हणाला.

‘खरं बोलायचं झालं तर मला भांडणे आवडत नाहीत. मी शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. जर माझ्यासमोर कोणी भांडत असेल तर मी तेथून निघून जातो. लोकांना माझे बिग बॉसच्या घरातील काम आवडणार नाही आणि मला दोन आठवड्यात शोमधून बाहेर काढतील’ असे तो पुढे म्हणाला आहे.

‘बिग बॉस’चा तेरावा सिझन फार चर्चेत होता. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने शोचं विजेतेपद जिंकलं होतं. तर असिम रियाज आणि शहनाज गिल दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. आता बिग बॉस १४मध्ये निया शर्मा, विवियन डिसेना आणि शेखर सुमन यांचा मुलगा व अभिनेता अध्ययन सुमन यांना विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 2:09 pm

Web Title: tv actor mishal raheja on participating in salman khan show bigg boss 14 avb 95
Next Stories
1 ‘तिला पहिले..’, मुलीच्या बॉलिवूडमधील पदार्पणावर अनुराग म्हणाला
2 “पुरस्कार द्या अन्यथा बहिष्कार टाकेन”; करण जोहरने समिक्षकांना दिली होती धमकी
3 निक-प्रियांकाच्या घरी चिमुकलीचं आगमन
Just Now!
X