News Flash

अभिनेत्री आर्थिक संकटात; मदतीच्या आवाहनसाठी रेणुका शहाणेंनी लिहिली पोस्ट

टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारची आर्थिक परिस्थिती बिकट असून तिला आईच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे.

नुपूर अलंकार, रेणुका शहाणे

लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात असलेल्या अभिनेत्रीला मदत करण्यासाठी रेणुका शहाणे यांनी फेसबुकवर लोकांना आवाहन केलं आहे. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारची आर्थिक परिस्थिती बिकट असून तिला आईच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे. अभिनयातून मिळणाऱ्या पैशाने नुपूर घरचा गाडा चालवत होती. मात्र लॉकडाउन आणि करोनाच्या संकटामुळे कमाईचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नुपूरच्या मदतीसाठी रेणुका शहाणेंनी फेसबुकवर आवाहन केलं आहे.

‘नुपूरचे सर्व पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याचा फटका तिलाही बसला आहे. तिच्या कमाईतून आतापर्यंत ती आईचा उपचार करत होती. मात्र लॉकडाउनमुळे ते सुद्धा बंद झालं आहे. तिच्या आईच्या उपचारासाठी कृपया जमेल तितकी आर्थिक मदत करा’, असं रेणुका यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासोबतच त्यांनी बँक अकाऊंटची माहितीसुद्धा दिली आहे.

आणखी वाचा : ‘काही हात सापडले, काही निसटले’; वडील मोहन गोखलेंसाठी सखीची भावूक पोस्ट 

नुपूरने आतापर्यंत अनेक छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केले आहे. ‘अगले जनम मोहे बिटियाँ ही कीजो’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘स्वरागिनी’ या मालिकांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. नूपुरला पीएमसी बँक घोटाळ्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे तिच्यावर दागिने विकण्याचीही वेळ आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 1:29 pm

Web Title: tv actor nupur alankar in financial distress friend renuka shahane posts plea for help ssv 92
Next Stories
1 “अमित शाहांना धड खोटंही बोलता येत नाही”; ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करुन अभिनेत्याचा टोला
2 अजय पंडिता यांच्या हत्येवर मौन का? कंगना रणौतने बॉलिवूड कलाकारांना फटकारलं
3 काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसेवर प्रीती झिंटाचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय
Just Now!
X