News Flash

छोट्या पडद्यावरचा ‘हा’ कलाकार लवकरच दिसणार आलिया भटसोबत!

बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण; आलिया भट असेल त्याची हिरॉईन!

छोट्या पडद्यावरचा अभिनेता पार्थ समथान कमी वेळाच भरपूर प्रसिद्ध झाला. डेलिसोपमध्ये काम करत करत तो घराघरात पोहोचला. लवकरच आता तो मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट दिसणार आहे.

पार्थने आपल्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल माहिती दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पार्थ या वर्षाच्या उत्तरार्धात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. पार्थ असंही म्हणाला की आऊटसाईडर असल्याने ही त्याच्यासाठी एक मोठी संधी असेल जी त्याला गमवायची नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan)

पार्थ आलियासोबत संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसणार अशी चर्चा होती. मात्र त्याबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती मिळाली नाही. पार्थने ‘पिहरवा’ हा चित्रपट साईन केल्याचं कळत आहे ज्यात आलियाही दिसणार आहे.

पार्थने २०१४ साली एमटीव्हीच्या ‘कैसी ये यारिया’ या मालिकेतून आपल्या करियरला सुरुवात केली होती. त्याच्या या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने एका चित्रपटासाठी छोट्या पडद्यावरुन विश्रांती घेतली. या चित्रपटाचं चित्रीकरणही सुरु होतं. पण तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. २०१८ मध्ये त्याने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत काम केलं. त्यामुळे त्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 3:51 pm

Web Title: tv actor parth samthaan will be seen with alia bhatt in movie vsk 98
Next Stories
1 लॉकडाउनमुळे घरातच वाढदिवस झाला; रामायणातील सीता सरकारवर नाराज
2 “इथे लोक मरत आहेत आणि IPL..,” राखी सावंत संतापली
3 “राहुल गांधी जनतेप्रती असलेलं कर्तव्य पार पाडतायत”- दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं मत
Just Now!
X