News Flash

अभिनेता राजीव पॉलला करोनाची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

सोशल मीडियावरून दिली माहिती

(photo-Instagram@rajevpaul)

देशात आलेली करोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घराघरात करोनाने शिरकाव केलाय. गेल्या काही दिवसात बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील अनेक सेलिब्रिटींना देखील करोनाची लागण झालंय. ‘ससुराल सिमर का-2 ‘ या मालिकेतील अभिनेता राजीव पॉल याला देखील करोनाची लागण झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

राजीव पॉलने सोशल मीडियावरून त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून उपचारासाठी तो रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली. इन्स्टाग्राम वर राजीवने एक पोस्ट शेअर केलीय. यात तो म्हणाला, ” परिस्थिती माझ्या हाता बाहेर जाण्याआधी योग्य हातांच्या मदतीने उपचार होणं गरजेचं आहे. माझा ताप कमी होत नाहिय. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालो. इथे उत्तम डॉक्टर आणि औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.” अशी माहिती त्याने कॅप्शनमध्ये दिलीय

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajev Paul (@rajevpaul)

यासोबतच राजीवने त्याच्या काही मित्र मैत्रिणींचे आभार मानले आहेत. राकेश पॉल, खाखी कुकी आणि अभिनेता सतीश कौशीक यांनी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याने राजीवने त्यांचे आभार मानले आहेत. “आयुष्यात योग्य लोकं असल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादासाठी आभार. जे या संकटाचा सामना करत आहेत त्या सर्वांसाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. ” असं राजीव म्हणाला आहे.

राजीवच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. अनूप सोनी, सिंपल कौल, निशा रावल, करण शर्मा या कलाकारांनी राजीवला कमेंट करत धीर दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 9:06 am

Web Title: tv actor rajiv paul tested covid positive hospitalized for further treatment kpw 89
Next Stories
1 “प्रतिमा बनवणं नव्हे तर जीव वाचवणं जास्त गरजेचं”, अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका
2 कुठे आणि किती वाजता बघता येणार सलमानचा ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ ?
3 मलायकाने केला अनुराग बासूसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X