News Flash

‘ये है आशिकी’फेम अभिनेत्याला करोनाची लागण

संजय छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता संजय कौशिक याला करोनाची लागण झाली आहे. ‘हनुमान जय श्री राम’ या मालिकेचं चित्रीकरण करत असतानाच त्याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या तो होम क्वारंटाइन झाला आहे, असं ‘टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“मला थोडासा खोकला झाला होता म्हणून मी चाचणी केली. त्यात मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच क्वारंटाइन झालो आहे”, असं संजयने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

#Beautifullife

A post shared by Sanjay Kaushik (@whosanjaykaushik) on

पुढे तो म्हणतो, “हनुमान जय क्षी राम या मालिकेचं चित्रीकरण करत असतानाच मला करोनाची लागण झाल्याचं समजलं त्यामुळे स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी मी घरी परतलो असून घरीच क्वारंटाइन झालो आहे”.

दरम्यान, संजय छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘हनुमान जय श्री राम’ या मालिकेत तो सध्या नारद ही भूमिका साकारत आहे. तसंच यापूर्वी तो ‘ये हैं आशिकी’, ‘प्या तूने क्या किया’ या मालिकेत झळकला होता. अलिकडेच ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांनादेखील करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 8:50 am

Web Title: tv actor sanjay kaushik tests covid 19 positive ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी आरोपींना दूरचित्रसंवाद्वारे न्यायालयात हजर करा’
2 प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये उर्वशी रौतेला साकारणार सीता?
3 एस. पी. बालसुब्रमण्यम यांची करोना चाचणी निगेटीव्ह; मात्र अजूनही व्हेंटिलेटरवर
Just Now!
X