30 September 2020

News Flash

अभिनेता शोएब इब्राहिमला चाहत्याने विचारला पत्नीच्या कपड्यांवरुन प्रश्न, रागात म्हणाला…

शोएबला चाहत्यांनी गप्पा मारताना हा प्रश्न विचारला आहे.

सध्या सामान्य माणसांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण लॉकडाउनमुळे घरात अडकून पडले आहेत. त्यामुळे मिळालेल्या वेळात अनेक कलाकारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार शोएब इब्राहिमने देखील सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. दरम्यान त्याला त्याची पत्नी दीपिका कक्करशी संबंधीत एक प्रश्न विचारण्यात आला होतो. जो पाहून शोएबला राग आला आणि त्याने त्या प्रश्नाचे सडेतोड उत्तर दिले आहे.

शोएब इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. त्यावेळी एका चाहत्याने दीपिका नेहमी सलवार सूटमध्ये दिसते. तुझ्या कुटुंबीयांनी तिला असे कपडे परिधान करण्यासाठी फोर्स केला आहे का? असा प्रश्न विचारला. त्याचा हा प्रश्न पाहून शोएबला राग आला आणि त्याला चाहत्याला त्याने चांगलेच सुनावले.

‘या प्रश्नाचे उत्तर देणे मला गरजेचे वाटत नाही. खरं माझ्या पत्नीला आणि मला माहित आहे. बाकी ज्याचे जसे विचार तसे प्रश्न’ असे त्यावर शोएबने उत्तर दिले आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने शोएबला ट्रोलिंगचा सामना कसा करतो ? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर त्याने ‘ट्रोलर्स हे फक्त रिकामटेकडे असतात आणि दुसऱ्यांच्या आनंदावर जळत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे’ असे उत्तर दिले आहे.

सध्या लॉकडाउनमुळे शोएब घरात पत्नी दीपिका कक्करसोबत वेळ घालवत आहे. त्याने सोशल मीडियावर काही दिवासांपूर्वी काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवरुन तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असल्याचे समोर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 11:46 am

Web Title: tv actor shoaib ibrahim fans asked about his wife dipika kakar dressing avb 95
Next Stories
1 ‘आपण कोणत्या देशात राहतो?’ करण जोहरच्या प्रश्नावर मुलाने दिलं ‘हे’ मजेशीर उत्तर
2 फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री
3 ‘प्रस्थानम’ चित्रपटातील अभिनेत्याच्या आईला करोनाची लागण
Just Now!
X