News Flash

बानीच्या प्रियकराने आगळ्या पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या प्रियकराचा खुलासा 'बिग बॉस' या शोमध्ये केला

सध्या ‘बिग बॉसच्या १०’ व्या पर्वात बानी जेने आज आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. बानीच्या वाढदिवसा दिवशी तिचा तथाकथित प्रियकर युवराज ठाकूरने आणि तिची मैत्रीण गौहर खानने तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बानीने काही दिवसांपूर्वी तिचा प्रियकर कोण याचा खुलासा केला होता. बानीने आपल्या प्रियकराचा खुलासा ‘बिग बॉस’ या शोमध्ये गौरव चोप्रासमोर केला होता. ती गौरवला म्हणाली होती की तिच्या प्रियकराचे आडनाव ‘टी’ने सुरु होते. यानंतर युवराज आणि बानी रिलेशनशिप आहेत असे कयास लावले जात आहेत. बानीच्या वाढदिवसानिमित्ताने युवराजने सोशल मीडियावर बानीसाठी एक व्हिडिओ शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पटियालाची राहणारी बानीने एम टीव्हीच्या शोमधून टीव्ही जगतात पाऊल ठेवले. रोडीजची ती उपविजेतीही होती. याशिवाय या शोच्या अनेक पर्वांचे तिने सुत्रसंचालनही केले आहे. बानीच्या प्रियकराशिवाय तिची मैत्रिण गौहर खाननेही सोशल मीडियामार्फत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वीजे बानी याच नावाने तिची ओळख आता बनली आहे.

वीजे बानी स्वतः फिटनेस फ्रिक आहे. तिने स्वतःच्या शरिरावर अनेक टॅटूही करुन घेतले आहेत. बानी अनेकदा तिचे व्यायाम करतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 7:56 pm

Web Title: tv actor yuvraj thakur admits he is in love with bani j wishes her birthday in the sweetest way
Next Stories
1 …म्हणून परिणीतीने आदित्यला मारला टोमणा
2 Yuvraj and Hazel Keech Wedding: युवीने शेअर केला लग्नसोहळ्यातील पहिला फोटो
3 ‘भय’च्या संगीताला बॉलिवूडचा साज!
Just Now!
X