News Flash

‘तेरे बाप की शादी है क्या?’ रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर भडकली अभिनेत्री

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना आवडला आहे

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. या २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. तरीही अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांना अभिनेत्रीने आवज देऊन चांगलेच सुनावले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन’मध्ये काम करणारी अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना चांगलेच सुनावले आहे. अनिताने टिक-टॉकचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती घराच्या खिडकीमध्ये उभी राहून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना ‘ए येडे, तेरे बाप की शादी है क्या?’ असे बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

This is for ppl who are already on the roads! @indiatiktok

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on

हा व्हिडीओ शेअर करत अनिताने ‘जे लोकं रस्त्यावर फिरत आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या अनिता कलर्स वाहिनीवरील ‘नागिन ४’ या मालिकेत दिसत आहे. या पूर्वी ती ‘नागिन ३’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 1:14 pm

Web Title: tv actress anita hassanandani video of angry on people who are walking on road avb 95
Next Stories
1 “रणवीर दिवसातले २० तास झोपलेला असतो, त्यामुळे…”; दीपिकाने सांगितली क्वारंटाइनची कथा
2 ११ बोटांमुळे हृतिक आला अडचणीत; पियानो वाजवणं झालं कठीण
3 रामायण प्रदर्शित होताच स्वारा भास्कर झाली ट्रोल, केली मंथराशी तुलना
Just Now!
X