छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानीने काही दिवसांपूर्वीच एका गोड बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर आता अनिताने एक इनोव्हेटिव्ह व्हिडीओच्या माध्यमातून बाळाचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच अनिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत पती रोहितदेखील दिसून येत आहे. यात अनिताचं बेबीबंप दिसत असून त्यावर एक फटाका ठेवण्यात आला आहे. या फटाक्याची वात रोहित पेटवतो आणि क्षणार्धात तो फटाका फुटतो. विशेष म्हणजे हा फटाका फुटल्यानंतर त्यातून हळूच अनिताचं बाळ समोर येतं. यात अनिता, रोहित आणि तिच्या बाळाच्या चेहऱ्यावर फटाक्याची राख दिसते.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करत अनिताने तिच्या बाळाचं नाव आरव ठेवल्याचंदेखील तिने जाहीर केलं. सध्या अनिताचा हा हटके व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.तर, लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 11:35 am