News Flash

सहा वर्षानंतर अभिनेत्रीचा झाला ब्रेकअप, म्हणाली आम्ही…

एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल आशा नेगी आणि ऋत्विक धनजानी यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. आता आशाने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या रिलेशनवर वक्तव्य केले आहे.

आशाने नुकाताच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने उत्तर देत ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. ‘लोक वगेळे होतात. त्यामुळे अनेकदा नाती तूटतात. पण आयुष्यात आपण त्या व्यक्तीच्या आठवणी सोबत घेऊन पुढे निघून जातो’ असे ती म्हणीली.’

 

View this post on Instagram

 

Happy birthday mad one! Thankyou for being YOU @rithvik_d

A post shared by MsNegi (@ashanegi) on

‘मी माझ्या खासगी आयुष्यावर फार बोलू इच्छित नाही. पण मी इतकं सांगेन की आम्ही अजूनही एकमेकांचा आदर करतो’ असे आशा पुढे म्हटले आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर ऋत्विक आणि आशाची ओळख झाली होती. २०१३मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. तसेच या जोडीने ‘नच बलिये ६’ मध्ये सहभाग घेऊन विजेतेपद मिळवले होते. आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याने चाहते दु:खी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 11:57 am

Web Title: tv actress asha negi talks about breakup with rithvik dhanjani avb 95
Next Stories
1 “ते १५ लाख एकत्र करुन हे पॅकेज बनवलं”; अनुराग कश्यपचा मोदींना टोला
2 सलमानच्या ‘तेरे बिना’ गाण्यातील लहान मुलगी आहे तरी कोण?
3 ‘तेरे बिना’मध्ये झळकलेली ‘ही’ चिमुकली आहे तरी कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Just Now!
X