News Flash

छोट्या पडद्यावरील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का?

ओळखा कोण आहे 'ही' अभिनेत्री

सोशल मीडिया हे सध्याच्या काळात प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे प्रत्येक जण सोशल मीडियामुळे सहज जोडला गेला आहे. तसंच चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यामधील अंतरदेखील कमी झालं आहे. त्यामुळे अनेक वेळा सेलिब्रिटी थेट फेसबुक लाइव्ह, इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असतात. यात अनेक वेळा ते त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळाही देत असतात. यातच छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या शालेय जीवनातील फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय साथ निभाना साथिया या मालिकेतील गोपीबहू अर्थात अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हे नाव आता प्रेक्षकांसाठी नवीन नाही. अलिडेच देवोलीनाने कलाविश्वात ९ वर्ष काम केलं असून तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. याच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देवोलीना अनेक वेळा सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यातच तिने तिच्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Memories

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena) on


देवोलीनाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात ती तिच्या मैत्रिणींसोबत दिसून येत आहे. हे फोटो चाहत्यांना आवडले असून त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.

दरम्यान, देवोलीनाला कलाविश्वात पदार्पण करुन जवळपास ९ वर्ष झाली आहेत. ‘साथ निभाना साथिया’, ‘बिग बॉस 13’ या कार्यक्रमातून ती विशेष नावारुपाला आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 3:33 pm

Web Title: tv actress devoleena bhattacharjee share childhood photos ssj 93
Next Stories
1 ‘टायगर सीरिज’च्या तिसऱ्या चित्रपटासाठी सलमान-कबीर खान करणार एकत्र काम?
2 ‘बॉलिवूडवर चर्चा करुन आपली दिशाभूल केली जातेय’; संगीतकाराने साधला सरकारवर निशाणा
3 रितेश-जेनेलियाचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण; प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन करणार लाँच
Just Now!
X