News Flash

बलात्काराचा आरोप असलेल्या पर्ल पुरीला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींवर देवोलीना संतापली!

'नागिग-३' मालिकेतील अभिनेता पर्ल वी पुरीला वसई पोलिसांनी अटक केलीय. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा पर्लवर आरोप आहे.

(photo-instagram)

गोपी बहू म्हणून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. विविध मुद्द्यावर देवोलीना सोशल मीडियावर तिचं मत मांडत असते. नुकतीच ‘नागिग-३’ मालिकेतील अभिनेता पर्ल वी पुरीला वसई पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा पर्लवर आरोप आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी पर्ल निर्दोष असल्याचं म्हणत त्याला पाठिंबा दिलाय. या सेलिब्रिटींवर आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्या चांगलीच भडकलीय.

निर्माती एकता कपूर, करिश्मा तन्ना, अनिता हसनंदानी, क्रिस्टर डिसूजा तसंच अभिनेत्री नीया शर्मा अशा अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पर्लला सपोर्ट केलाय. यानंतर सपोर्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर अभिनेत्री देवोलिनाने नाव न घेता निशाणा साधला आहे. देवोलीनाने ट्विटरवर काही पोस्ट शेअर करत संताप व्यत केलाय. “थोडी तरी माणुसकी दाखवा. किती घाणेरडे लोक आहात तुम्ही, मूर्खांनो डिक्शनरी उघडा आणि ‘सहानभूती’ या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. या वायफळ चर्चा थांबवा आणि कोर्टाला काय ते ठरवू द्या. माणूसकीची हीन पातळी.” अशा आशयाची पोस्ट देवोलीनाने  शेअर केलीय.

हे देखील वाचा: बिकिनी लूकनंतर ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तरांच्या सोनूचा बोल्ड फोटो व्हायरल

त्या कलाकारांवर देवोलिना भडकली!

तर पीडित मुलीच्या आईला इन्स्टाग्रामवर कमेंट करून छळणाऱ्या नेटकऱ्यांवर देखील देवोलीना भडकली आहे. “तुमच्यात थोडी जरी माणुसकी असती तर त्या लहान मुलीच्या आईच्या अकाऊंटवर जाऊन कमेंट करण्याआधी शंभर वेळा विचार केला असता.” असं ती म्हणाली आहे. तर पर्लची बाजू मांडणाऱ्या सेलिब्रिटींवर देवोलिनाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे त्याला कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही. मात्र त्या चुमकल्या मुलीचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाला कर्माची फळं भोगावीच लागतील. आंदोलनं करा, हरताळ करा आणि दाखवा तुमचा पाठिंबा. पण ही घाण पसरणं बंद करा.” असं देवोलीना म्हणालीय.

हे देखील वाचा: मार्वल स्टुडिओच्या ‘मिस मार्वल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार?; नेटकऱ्यांमध्ये चर्चा

पर्लला पाठिंबा द्यायचा असेल तर पोलिस स्टेशन आणि न्यायालयात जा असं म्हणत देवोलीनाने  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेता पर्ल पुरीला पाठिंबा देणाऱ्या कलाकारांवर सडकून टीका केलीय.

४ जूनला पर्लसह ६ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पास्को कायद्या अंतर्गत सर्व आरोपींवर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पर्लवर कारवाई करण्यात आल्यानंतर एकता कपूरने एक पोस्ट शेअर करत पर्ल निर्रोष असल्याचं म्हंटलं आहे. तर करिश्मा तन्नाने देखील पर्लला पाठिंबा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 4:42 pm

Web Title: tv actress devoleena bhattacharjee slams celebrity support pearl v puri arrested in rape allegations kpw 89
Next Stories
1 तरला जोशी यांच्या निधनानंतर सहकलाकार निया शर्मा भावूक
2 “सुशांत ड्रग्ज घेतो हे कुटुंबीयांना माहिती होते”, रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा
3 ‘Indian Idol 12’ च्या सेटवर ‘झीनी बेबी’ची एन्ट्री; रिक्रिएट केला १९७९ सालच्या ‘द ग्रेट गॅम्बलर’चा सीन
Just Now!
X