30 October 2020

News Flash

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमारला करोनाची लागण

१० दिवसांपूर्वी दिशाच्या आईलादेखील करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमार हिला करोनाची लागण झाली आहे. दिशाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. दिशाला करोनाची लागण होण्याच्या १० दिवसांपूर्वी तिच्या आईची चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली होती.

“असं म्हटलं जातं की वाईट वेळ कधी, कोणत्या क्षणी  येईल हे सांगता येत नाही आणि संकटकाळात सकारात्मक विचार करणं इतकंही कठीण नाही”, असं म्हणत दिशाने तिला करोना झाल्याची माहिती दिली आहे.

दिशाने तिला करोना झाल्याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच तिने तिच्या प्रियकरासाठी राहुल वैद्यसाठी एक पोस्ट लिहिली. तसंच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या. “खरं तर तुला प्रत्यक्षात समोर येऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र सध्या ते शक्य नाहीये. पण तुला भरपूर यश मिळो”, असं म्हणत दिशाने राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, दिशा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, वो अपना सा या गाजलेल्या मालिकांमध्ये झळकली आहे. दिशापूर्वी राजेश्वरी सचदेव आणि श्वेता तिवारीला करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 8:54 am

Web Title: tv actress disha parmar tests positive for coronavirus ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘रॉबिनहुड बिहार के’; माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील गाणं झालं व्हायरल
2 अभिनेत्रींना ‘एनसीबी’चे समन्स
3 अभिनेत्री श्वेता तिवारी करोना पॉझिटीव्ह
Just Now!
X