News Flash

लॉकडाउनमुळे परदेशात अडकलेल्या अभिनेत्रीला तब्बल दोन वर्षांनंतर आईने केला फोन

या कारणामुळे तिची आई बोलत नव्हती.

करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशातच नाही जगभरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माहिका शर्माचा देखील समावेश आहे. पण लॉकडाउनमुळे माहिका आणि तिच्या आईमध्ये जवळपास दोन वर्षानंतर संवाद झाला आहे.

माहिका तिच्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिने अडल्ट स्टार डॅनी डीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. तसेच तिच्या खासगी आयुष्यावरही याचा परिणाम झाला होता. तिच्या घरातल्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले होते. गेल्या दोन वर्षांपासून माहिकाच्या आईने तिच्याशी संवाद साधला नव्हता. पण आता त्यांच्यात संवाद झाला असल्याचे समोर आले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी माहिका यूकेला फिरायला गेली होती. पण करोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आणि माहिका तेथेच अडकली. ही गोष्ट माहिकाच्या आईला कळताच त्यांना काळजी वाटू लागली. जवळपास दोन वर्षानंतर माहिकाच्या आईने तिला फोन केला असल्याचे म्हटले जात आहे.

‘गेल्या दोन वर्षांपासून आई आणि माझे काही बोलणे झाले नव्हते. तिने मला सगळीकडे ब्लॉक केले होते. त्यामुळे मलाही तिच्याशी संपर्क साधता आला नाही. मी अडल्ट फिल्म स्टारला डेट करते असे तिला वाटले होते. पण मला फक्त त्याच्यासोबत चित्रपटात काम करायचे होते’ असे माहिका म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘जेव्हा माझ्या आईला कळाले की मी यूकेमध्ये अडकले आहे तेव्हा तिला माझी काळजी वाटू लागली. तिने मला फोन केला आणि फोनवर रडू लागली. तिला मला लवकरात लवकर भेटायचे आहे असं ती म्हणू लागली. मला फार आनंद होत आहे आता सगळं काही ठिक होईल.’

माहिकाने कॉमेडी प्रोग्राम एफआयआरमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने ‘तू मेरे अगल बदल है’ या मालिकेमध्ये काम केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 5:13 pm

Web Title: tv actress mahika sharma stuck in uk during coronavirus lockdown he mother called her after 2 years avb 95
Next Stories
1 करोना व्हायरसशी संबंधीत आहे केबीसी रेजिस्ट्रेशनचा पहिला प्रश्न
2 mothers day 2020 : खास फोटो शेअर करत हेमामालिनींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
3 ‘विशाखापट्टणममध्ये संकटात सापडलेल्यांना मदत करा’; अभिनेत्याचं आवाहन
Just Now!
X