News Flash

लाईक्स मिळविण्याच्या नादात निया झाली ट्रोल

'एक हजारो में मेरी बहेना है' या लोकप्रिय हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निया शर्मा यावेळी मात्र चांगलीच ट्रोल झाली आहे.

निया शर्मा

छोट्या पडद्यावरील कमी कालावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री निया शर्मा आपल्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत असते. निया अनेक वेळा आपले फोटो इन्टाग्रामवर पोस्ट करत असल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर आशिया खंडातील सेक्सी महिलांमध्येही तिची गणना केली जाते. ‘एक हजारो में मेरी बहेना है’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निया शर्मा यावेळी मात्र चांगलीच ट्रोल झाली आहे.
नियाने मध्यंतरी एक फोटोशूट केले असून आपल्या चाहत्यांसाठी यातील काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. मात्र यावेळी तिच्यावर कौतुकांचा पाऊस पडण्याऐवजी नेटक-यांच्या टीकेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नियाने इन्स्टावर एक बोल्ड फोटो शेअर केला असून यात तिने निळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे.

वाचा : अमिताभ बच्चन यांच्यामुळेच माझ्यासारख्यांना काम मिळतंय- ऋषी कपूर

नियाने लावलेल्या निळ्या रंगाच्या लिपस्टिकमुळे तिच्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत कमेंटमध्ये बरेवाईट सुनावले आहे. प्रयोगशीलतेच्या नावावर नियाने केलेल्या कृतीमुळे एका ट्रोलक-याने अत्यंत वाईट रंगाची लिपस्टिक असल्याचे म्हटले आहे.
खरे पाहता असे प्रयोग करताना अभिनेत्री विशेष काळजी घेत असतात. मात्र निया अनेक वेळा असे प्रयोग करत असून त्याचे फोटोही शेअर करत असते. ‘एक हजारो में मेरी बहेना है’ या मालिकेव्यतिरिक्त ती ‘जमाई राजा’ या मालिकेमध्येही झळकली आहे. आपल्या अभिनयापेक्षा निया तिच्या सोशल मिडीयावरील वावरामुळे जास्त चर्चेत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 4:45 pm

Web Title: tv actress nia sharma trolled wearing blue lipstick
Next Stories
1 प्रसेनजीत कोसंबीला अवधूत गुप्तेकडून खास भेट!
2 वाढत्या उन्हाळ्यात ‘कूल’ राहण्यासाठी जॅकलिन देतेय खास टीप्स
3 मृण्मयी देशपांडे ‘फर्जंद’मध्ये साकारणार हेरगिरीची भूमिका
Just Now!
X