01 March 2021

News Flash

काबिलमधील ‘ही’ अभिनेत्री करणार मराठीत पदार्पण?

या अभिनेत्रीने काबिलमध्ये छोटेखानी भूमिका साकारली आहे

संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ चित्रपटात झळकणार आहे. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. परंतु या चित्रपटांमधील प्रत्येक कलाकाराचा अभिनय मात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. यामध्ये अभिनेत्री नीलम पांचाल हिने छोटेखानी भूमिका साकारली असून तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केल्यानंतर निलम लवकरच मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे.

नीलम सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे. नीलम लवकरच मराठीत पदार्पण करणार असल्यामुळे ती तयारी करत आहे. याविषयी तिला विचारले असता तिने दुजोरा दिला आहे.


“हो मी सध्या माझ्या मराठीसृष्टीतल्या पदार्पणाची तयारी करत आहे. मी मुंबईत राहत असल्याने आणि मराठी चित्रपट पाहण्याची आवड असल्यामुळे मला मराठी समजतं. पण मला बोलता येत नाही. पण आता मराठीत पदार्पण करत असल्याने मराठीचे धडे गिरवणे सध्या सुरू आहे,” असं नीलमने सांगितलं.

वाचा : Video : नीना गुप्ता सलमानला मारणार प्रेमाची मिठी!

पुढे ती म्हणते, “सध्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. मराठीतल्या एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत आहे. परंतु निर्मात्यांकडून अधिकृतपणे घोषणा न झाल्यामुळे मी याविषयी फार काही बोलू शकत नाही. दरम्यान, नीलम मराठी चित्रपटात झळकणार की वेब सिरीजमध्ये हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नीलम आतापर्यंत ‘इश्कबाज’, ‘वीरा’, ‘रूक जाना नहीं’, ‘हमारी देवरानी’ या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 4:46 pm

Web Title: tv actress niilam paanchal debut in marathi ssj 93
Next Stories
1 कतरिनाच्या आयुष्यात आला नवा तरुण; पडली पुन्हा एकदा प्रेमात?
2 कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर येणार बायोपिक
3 आशिकी फेम राहुल रॉय अद्याप बॅचलर; कारण ऐकून व्हाल थक्क
Just Now!
X