‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चंचल तरुणी ते सोज्वळ सुन अशा विविध प्रकारच्या भूमिका तिने मालिकांमधून साकारल्या आहेत. मात्र दमदार अभिनय करण्याची क्षमता असतानाही केवळ छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून तिला ऑडिशन्समध्ये रिजेक्ट केलं जातं. असा बॉलिवूडचा अनुभव तिने सांगितला.

अवश्य पाहा – “शीख, मुस्लिम, हिंदू प्रत्येक जण माझ्या विरोधात”; कंगनाने व्यक्त केलं दु:ख

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिवांगीने आपल्या करिअरमधील एक चकित करणारा अनुभव सांगितला. काही वर्षांपूर्वी ती एका बॉलिवूड चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती. परंतु त्या ठिकाणी कास्टिंग डिरेक्टरनं तिला तुच्छतेने वागवलं. कॉश्चूम डिझायनरनं तर केवळ ती टिव्ही सीरिअलमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे म्हणून तेथील कपड्यांना स्पर्श देखील करु दिला नाही.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

ती म्हणाली, “चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्यांना वरकरणी कलाकारचं म्हटलं जातं. पण खरं पाहाता चित्रपटांमध्ये काम करणारे श्रेष्ठ कलाकार असा काहीसा समज आपल्या सिनेसृष्टीत आहे. जे टीव्ही कलाकार ऑडिशन्सला जातात त्यांना तुच्छतेने वागवलं जातं. ते लहान माध्यमातील कलाकार आहेत याची जाणीवपूर्वक त्यांना आठवण करुन दिली जाते. हा प्रकार माझ्यासोबत अनेकदा घडला आहे.”

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आहे. २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘ये प्यार तुने क्या किया’, ‘लव्ह बाय चांस’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ यांसारख्या मालिकांमध्ये लहानमोठया भूमिका साकारल्या. अलिकडेच ती ‘द लिटिल थिंग्ज’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती.