News Flash

‘या’ अभिनेत्रीसाठी हिमेश रेशमियाने घेतला घटस्फोट?

हिमेश आणि त्याची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.

हिमेश रेशमिया

संगीतकार, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार आहे हे नुकतेच प्रसारमाध्यमांसमोर उघड झाले आहे. कोमल आणि हिमेश या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही वांद्रे येथील न्यायालयात मंगळवारी घटस्फोटासाठीचा अर्ज भरला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत. पण या दोघांचे वेगळे होण्याचे कारण कोण आहे असाच प्रश्न अनेकांना पडत असतानाच आता त्यामागचे कारण स्पष्ट झाले आहे अशी चर्चा आहे.

गेल्या दहा वर्षांपासून हिमेशचे टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरशी नाव जोडले जातेय. विशेष म्हणजे गेले काही महिने हिमेश आणि कोमल वेगळे राहत असून तिला सोनियासोबत असलेले त्याचे अफेयर माहित होते आणि तिची काही हरकतसुद्धा नव्हती. अखेर दोघांनी नात्याला कायदेशीर विराम देण्याचे ठरवले आणि त्यानुसार घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.

सर्वप्रथम २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिली चार वर्षे हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच करुन दिली होती. पण, या दोघांची वाढती सलगी मीडियापासून काही लपून राहिली नाही. कुटुंबियांच्या विरोधामुळे मग काही काळासाठी दोघांनी एकमेकांपासून अंतर राखून ठेवले. परंतु हिमेशच्या वडीलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलला म्हणजेच हिमेशच्या पत्नीला याची पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही. हिमेश आणि कोमल या दोघांना एक मुलगा आहे. स्वयं असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

तसं पाहायला गेलं तर हिमेशचा म्युझिकल अल्बम नुकताच प्रदर्शित झाला आहे. या अल्बममध्ये हिमेश सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतुरसोबत गाणे गाताना दिसत आहे. या अल्बमच्या प्रदर्शनावेळी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही उपस्थित होते. सलमान आणि लुलिया हे अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. पण काही दिवसांपूर्वी लुलियाने तिचे आणि सलमानचे संबंध हे मित्रत्वाचे आहे. याहून जास्त त्या दोघांमध्ये काहीच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 5:33 pm

Web Title: tv actress sonia kapoor to be blamed for himesh reshammiyas divorce
Next Stories
1 #Dangal VIDEO: तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल.. ‘दंगल’चे दमदार शिर्षकगीत
2 संजूबाबाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
3 आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणावे की पॅशनेट?
Just Now!
X