News Flash

लवकरच भेटीला येणार ‘पवित्र रिश्ता २’ ; पुन्हा अंकिता लोखंडे बनणार अर्चना देशमुख

पहा कोण दिसणार मानवच्या भूमिकेत ?

छोट्या पडद्यावरून अगदी लोकांच्या घराघरात पोहोचलेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आता तुमच्या भेटीला येण्यासाठी तयार झालेली आहे. या शोमधून अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांना बरीच लोकप्रियता मिळाली होती. या शोदरम्यान प्रत्येकांच्या घरा-घरात सुशांचे चाहते झाले होते. यात त्याने मानवची भूमिका साकारली होती. त्याच्या चेहऱ्यावरील सोज्वळ हावभाव, साधा-भोळा स्वभाव यामुळे लोकांनी मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. अजुनही प्रेक्षक या मालिकेला विसरला नाही. त्यामूळे पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता २’ लोकांच्या भेटीसाठी तयार झाला असून अंकिता लोखंडेच पुन्हा एकदा अर्चनाची भूमिका करणार आहे.

लोक आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘पवित्र रिश्ता २’ मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या मालिकेच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीच एकता कपूर हीने यावर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर या मालिकेच्या सिक्वेलमध्ये अर्चना-मानवच्या भूमिकेत कोण दिसणार ? तसंच पुन्हा एकदा अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका करणार का ? असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले होते.

काही दिवसांपूर्वीच अकिंता लोखंडे हीने ‘पवित्र रिश्ता २’ साठी शो साईन केला आहे. त्यामूळे पुन्हा एकदा अंकिता लोखंडेच अर्चनाच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतू मानवच्या भूमिकेसाठी शोच्या मेकर्सचा शोध सुरू असल्याचं बोललं जातंय. मानवच्या भूमिकेसाठी नव्या कलाकाराचीच निवड केली जाऊ शकते, असं देखील बोललं जातंय. अजुन तरी मानवच्या भूमिकेसाठीची नावं समोर आली नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

टिव्हीवरील लोकप्रिय शो ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुरवातीला मानव-अर्चनाच्या जोडीला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. कुटूंबातील भांडणांमधला दोघांचा मायाळू स्वभाव आणि निखळ प्रेम यामूळे ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी झाली होती. ज्या पद्धतीने सुरवातीला सुशांतने मानवच्या भूमिकेतून लोकांच्या मनात जागा केली होती, त्याच पद्धतीने जम बसवणाऱ्या कलाकाराची निवड मानवसाठी केली जाणार असल्याची चर्चा सुरूय. तसंच मानवच्या भूमिकेला साकारणं हे त्या नव्या कलाकारासाठी देखील मोठं आव्हान असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचं दिग्दर्शन कुशाल जावेरी यांनी केलं होतं. परंतू दुसऱ्या सिक्वेलमध्ये ते मालिकेचं दिग्दर्शन करणार नसले तरी मालिकेशी जोडलेले राहणार आहेत. ही मालिका बालाजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुशांतच्या चाहत्यांसाठी ही मालिक नेहमीच खास असणार आहे. यात सुशांतची भूमिका नसणार याची खंत मात्र त्याच्या चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे सुशांतच्या जागी आता कोणाची वर्णी लागते हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 12:41 pm

Web Title: tv ankita lokhande pavitra rishta to come back new actor will play sushant singh rajput role prp 93
Next Stories
1 …म्हणून टॉम क्रूजने परत केले तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार
2 “बॉलिवूडमध्येही लैंगिक भेदभाव”, अभिनेत्री दिया मिर्झाचा खुलासा
3 ‘तारक मेहता…’मधील ‘टप्पू’च्या वडिलांचे निधन
Just Now!
X