26 January 2021

News Flash

‘अनिल कपूर स्वत:ला काय समजतो?’; अनुपम खेर यांचा मजेशीर सवाल

अनुपम खेर यांनी ट्विट करत शेअर केला व्हिडीओ

बॉलिवूड कलाकारांमधील मैत्री, राग-रुसवे, त्यांच्यातील भांडणं यांच्याविषयी चाहत्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असतात. अनेकदा काही कलाकारांचा सोशल मीडियावरही वाद रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्येच आता अनुपम खेर यांनी ट्विट करुन अनिल कपूर स्वत:ला काय समजतो? असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

खरं तर अनुपम खेर, अनिल कपूर आणि सतीश कौशिक यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. अभिनयासोबतच हे तीन कलाकार खासकरुन त्यांच्या मैत्रीसाठी ओळखले जातात. मात्र, अनुपम खेर यांनी अनिल कपूरविषयी केलेल्या ट्विटमुळे अनेकांचं लक्ष त्यांच्या मैत्रीकडे वेधलं गेलं आहे.

अलिकडेच अनुपम खेर, सतीश कौशिक आणि पंकज त्रिपाठी यांनी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी अनुपम खेर व सतीश कौशिक यांनी त्यांच्या मैत्रीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात ज्यावेळी अनुपम आणि मी एकत्र असतो त्यावेळी अनिलविषयी गॉसिप करतो. तर, जेव्हा अनुपम आमच्यासोबत नसतो, त्यावेळी मी आणि अनिल त्याच्याविषयी गॉसिप करतो असा खुलासा सतीश कौशिक यांनी केला. त्यांच्या या वाक्यानंतर अनिल कपूर स्वत:ला काय समजतो असा मजेशीर सवाल अनुपम यांनी विचारला.

“हा अनिल स्वत:ला काय समजतो. मोठा आजकाल बॉडी वगैरे दाखवत फिरतोय”, असं अनुपम खेर म्हणाले. विशेष म्हणजे हा व्हिडीओदेखील त्यांनी ट्विटवर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या तिघांच्या मैत्रीची आणि अनुपम य़ांनी शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 12:52 pm

Web Title: tv anupam kher satish kaushik pankaj tripathi in the kapil sharma show watch promo ssj 93
Next Stories
1 ‘देवमाणूस’मधील सरू आजी ठरतायेत रॉकस्टार; Social Media वर म्हणीचा धुमाकूळ
2 ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात
3 अभिनेता रजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता
Just Now!
X