29 October 2020

News Flash

निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…

एकता कपूरच्या नागिननं मराठी गाण्यांवर घातली फुगडी; हा व्हिडीओ एकदा पाहाच...

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते. यावेळी निया मराठमोळ्या सैराट गाण्यामुळे चर्चेत आहे. नियाने आजीबाईंसोबत एका पार्टीत ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर डान्स केला होता. या डान्सचा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – “बॉलिवूडमधील लांडगे एकत्र आले”; सलमान-आमिरवर कंगना रणौत संतापली

अवश्य पाहा – “मला अनफॉलो करा पण सलमानवर टीका करु नका”; अभिनेत्रीची देशवासीयांना विनंती

नियाच्या घरात झालेल्या एका पार्टीतील हा व्हिडीओ आहे. या घरगुती पार्टीत रवी दुबे, सर्गुन मेहता, रायना मल्होत्रा यांसारख्या अनेक टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान निया आणि सर्गुनने हाऊसकिपर आजीबाईंसोबत सैराट चित्रपटातील गाण्यावर झिंगाट डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ नियाच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:11 pm

Web Title: tv naagin nia sharma zing zing zingat dance video mppg 94
Next Stories
1 “मला लिंबू पाणी दिलं तरच…”; सोनू सूदची अजब अट
2 ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत नवा ट्विस्ट
3 कुमार सानू यांना करोनाची लागण
Just Now!
X