News Flash

निक्की तांबोळीने केपटाउनवरून शेअर केले बोल्ड फोटोज ; दिलखेचक अंदाज पाहून फॅन्स फिदा

फोटोजवर चाहत्यांकडून मिळतायत लाइक्स आणि कमेंट्स

गेल्या काही दिवसांपासून ‘खतरों के खिलाडी ११’ शो वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलाय. तर दुसरीकडे यातील कलाकार स्पर्धक शोच्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकाची राजधानी केपटाउनमध्ये पोहोचली आहे. या शोमधलं पहिलं एलिमिनेशन झालं असून यात विशाल आदित्य सिंह आऊट झालाय. हा शो जिंकण्यासाठी कलाकार स्पर्धकांमध्ये काटें की टक्कर पहायला मिळणार आहे. अशात शो मधील कलाकार स्पर्धक निक्की तांबोळीने नुकतंच तिचे लेटेस्ट हॉट फोटोज पोस्ट केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोंमधल्या तिच्या दिलखेचक अदांनी फॅन्स फिदा झाले आहेत.

निक्की तांबोळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लेटेस्ट हॉट आणि बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. यात निक्कीने लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोज शेअर केल्याने सध्या ती चर्चेत आली आहे. या फोटोंमधला तिचा अनोखा अंदाज पाहून तिचे फॅन्स देखील फिदा झाले आहेत. हे फोटोज शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “चमत्कार अभिमानी प्राणी आहे…जे लोक यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्यासमोर ते प्रकट होत नाहीत.” निक्की तांबोळीने शेअर केलेल्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

काही दिवसांपूर्वीच तिने केपटाउनमधून तिचे बोल्ड फोटोज तिने शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या हॉट मोनोकिनीमध्ये खूपच बोल्ड दिसून आली होती. समुद्र किनारी ती या फोटोंमध्ये सिजलिंग पोजेस देत होती. या फोटोंच्या माध्यमातून फॅन्सकडून वाहवा मिळवण्यात तीने बाजी मारली आहे. यापुर्वी सुद्धा तीने ‘बिग बॉस’ मधून तिच्या स्टाइल आणि फॅशन सेन्सने प्रेक्षकांची मन जिंकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये निक्की तांबोळी हिच्यासह राहुल वैद्य, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, सना मकबूल, विशाल आदित्य सिंह, अभिनव शुक्ला, आस्था गिल, महक चहल सारखे सेलिब्रिटीज स्पर्धक दिसून येत आहेत. केपटाउनमध्ये पोहोचल्यानंतर ही सर्व मंडळी मजा करत तिथले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 8:16 pm

Web Title: tv nikki tamboli share her bold and hot photos in red bodycon from cape town prp 93
Next Stories
1 अवघ्या १५ मिनिटांचा लग्न सोहळा…वाढदिवसादिवशी ‘अप्सरा’ने दिली गोड बातमी!
2 “ते क्षण जगता आले जे माझ्या लहानपणी मला मिळाले नाही..” ; अर्जुन कपूरने व्यक्त केल्या भावना
3 औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर भडकला गुरमीत चौधरी; म्हणाला, ‘त्यांना जगण्याचाच हक्क नाही’
Just Now!
X