News Flash

४६ वर्षांच्या एकता कपूरने सांगितले होते लग्न न करण्यामागचे कारण

तिने दिलेले मजेशीर उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

तिने दिलेले मजेशीर उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक मालिका आणि सीरिजची निर्मिती केली आहे. एकता कपूर टेलिव्हिजन क्वीन म्हणून देखील ओळखली जाते. आज ७ जून रोजी एकताचा वाढदिवस आहे. ती ४६ वर्षांची झाली आहे. पण एकताने अद्याप लग्न केलेले नाही. तिने लग्न का केले नाही असा प्रश्न अनेकदा तिला विचारला जातो. एका मुलाखतीमध्ये तिला लग्न का केले नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

एकता कपूरने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. तिच्या काही मालिक संपून जवळपास १० ते १५ वर्षे उलटली आहेत. तरी देखील त्या मालिकांमधील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन असल्याचे पाहायला मिळते. एकता कपूर आता ४६ वर्षांची झाली आहे. ती कधी लग्न करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिला ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर एकताने मजेशीर अंदाजात उत्तर दिले होते. त्यावेळी तिने बॉलिवूडचा भाईजान सलमान खान जेव्हा लग्न करणार तेव्हा त्याच्या दोन वर्षांनंतर ती लग्न करणार असल्याचे सांगितले होते. ‘मी लग्न करणार. सल्लू भाईच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर’ असे तिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा : जिथे लहानशा खोलीत बालपण घालवलं, त्याच शहरात नेहानं घेतला आलिशान बंगला!

एकता कपूरने तिच्या करिअरची सुरुवात १९९५मध्ये सुरु केल्याचे म्हटले जाते. आज ती टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाते. तिच्या मालिका सर्वाधिक पाहिल्या जातात. आज एकताचा ४६वा वाढदिवस आहे आणि तिने तिच्या करिअरमध्ये ४० पेक्षा जास्त मालिका तसेच अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

तिच्या ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसौदी जिंदगी की’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘नागिन’ या मालिका विशेष गाजल्या. तसेच या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री स्मृति ईराणी, साक्षी तन्वर, श्वेता तिवारी, मौनी रॉय यांचे संपूर्ण आयुष्य एकता कपूरने बदलून टाकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 10:41 am

Web Title: tv queen ekta kapoor 46th birthday know about when she get marry avb 95
Next Stories
1 ट्रोल झाल्यानंतर रॅपर आदित्य तिवारी बेपत्ता, सोशल मीडिया पोस्टमुळे चाहते चिंताग्रस्त
2 “माझी चप्पल आणा”, यामी गौतमच्या फोटोवर ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर
3 लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
Just Now!
X