News Flash

मालिकांचे चित्रीकरण परगावी

महाराष्ट्रात पंधरा दिवसांसाठी सगळ्याच चित्रीकरणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीनंतर थांबलेल्या चित्रीकरणामुळे गमवाव्या लागलेल्या प्रेक्षकसंख्येसारखे यंदा घडू नये आणि त्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू नये म्हणून हिंदी मालिका निर्मात्यांनी परराज्यातील सुरक्षितस्थळी जाऊन चित्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. दक्षिणेत गोवा, हैदराबादपासून उत्तरेत लखनौ हरियाणापर्यंत निर्मात्यांनी आपल्या कलाकारवृंदाला नेण्यास सुरुवात केली.

गेल्या वर्षभरातील तीन महिने मालिकांचे चित्रीकरण बंद होते. त्यामुळे झालेल्या आर्थिक फटक्यातून सध्या सावरत असताना महाराष्ट्रात नवी टाळेबंदी लागली. या परिस्थितीत मालिकांचे चित्रीकरण कोणत्याही कारणाने थांबू नये यासाठी हिंदी मालिकांच्या निर्मात्यांनी बाहेरगावी चित्रीकरण स्थळे शोधण्यास सुरुवात के ली. लवकरच तेथे कामाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्रात पंधरा दिवसांसाठी सगळ्याच चित्रीकरणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या निर्मात्यांकडे एका आठवडय़ाच्या भागांचे चित्रीकरण उपलब्ध आहे, मात्र त्यानंतर जुनेच भाग नव्याने दाखवण्यावाचून पर्याय उरणार नाही. राज्य सरकारने करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे, मात्र हे निर्बंध आणखी काही दिवस राहिले तर निर्माते आणि वाहिन्यांचे सर्वाधिक आर्थिक नुकसान होऊ शकते.

सध्या हैदराबाद, गोवा, हरियाणा, लखनौ आणि भोपाळमध्ये हिंदी मालिकांचे चित्रीकरण के ले जाणार असल्याची माहिती ‘फे डरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉईज’चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिली. उत्तर प्रदेश तसेच भोपाळमध्ये चित्रीकरणासाठी सरकारकडून अनुदान आणि सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्मात्यांचा काही खर्च सुटतो. त्यामुळे तिथे मालिकांच्या चित्रीकरणाला पसंती जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदीतील सर्वच मोठय़ा मालिकांचे चित्रीकरण बाहेरगावी सुरू झाले आहे. गोव्यात आणि हैदराबाद येथे चित्रीकरणावर निर्बंध नाहीत, शिवाय हैदराबादमध्ये रामोजी फिल्मसिटीत तयार सेट किं वा बंगले असल्याने तिथे जाऊन चित्रीकरण सहज शक्य असल्याने निर्मात्यांनी तिथे मोर्चा वळवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयपीएलची भीती..

मालिका थांबल्या तर प्रेक्षक सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांक डे ओढले जातील. तेथे गेलेला प्रेक्षक पुन्हा मिळवणे अवघड असल्याने मालिका निर्मात्यांनी तातडीने निर्णय घेत बाहेरगावी आपला कलाकारवृंद नेण्याची तयारी केली. वाहिन्यांना ‘ओटीटी’कडे ओढला गेलेला प्रेक्षक पुन्हा आणण्यासाठीही खूप प्रयत्न करावे लागत आहेत.

कोण, कुठे?

निर्माती एकता कपूरची ‘कु मकु म भाग्य’ आणि ‘कुं डली भाग्य’ या दोन्ही मालिका आणि झी टीव्हीवरील ‘अपना टाईम भी आएगा’ या मालिकांचे चित्रीकरण गोव्यात लवकरच सुरू होणार आहे. मालिके तील कलाकारांनीही बाहेरगावी जाऊन चित्रीकरण करण्याची तयारी दाखवली आहे. ‘क्यूं रिश्तो में कट्टी बट्टी’ ही मालिका सुरतमध्ये तर ‘हमारीवाली गुड न्यूज’ ही मालिका हरियाणात चित्रित के ली जाणार आहे. ‘राधे कृष्ण’ ही मालिका उंबरगाव येथे चित्रित होत आहे, तेथील स्टुडिओतही काही मालिकांचे चित्रीकरण होऊ शकते.

मराठी निर्मात्यांवरही दबाव

हिंदी मालिका बाहेरगावी जाऊन चित्रीकरण करत असल्याने मराठी मालिकांचे निर्माते आणि वाहिन्या यांच्यावरही अप्रत्यक्ष दबाव आहे. मात्र मराठी मालिकांचा आर्थिक डोलारा कमी असल्याने निर्मात्यांना बाहेरगावी चित्रीकरण करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने ‘आयपीएल’ क्रिकेटला असते त्याप्रमाणे ‘बायो बबल’ सुरक्षा पद्धतीनुसार चित्रीकरण करण्याची परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खर्च कुणाचा?

चित्रीकरणस्थळी करोनापासून संरक्षण करण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील त्याचा खर्च वाहिन्या उचलतील, असे गेल्या वर्षी चित्रीकरणाला सुरुवात करताना निर्माते आणि वाहिन्यांमध्ये परस्पर सामंजस्याने ठरले होते. आता चित्रीकरण स्थळ दुसऱ्या राज्यात हलवावे लागले तर येणाऱ्या खर्चाचा भार वाहिन्यांची उचलायला हवा. ‘बायो बबल’ पद्धतीने चित्रीकरण करतानाही कलाकारांचा हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च आणि इतर खर्चही वाहिन्यांनी करावा, अशी मागणी ‘आयएफटीपीसी’ने पत्राद्वारे वाहिन्यांकडे के ली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 3:25 am

Web Title: tv serial shooting held in other state of india zws 70
Next Stories
1  गंगूबाई.. तेलुगूतही!
2 ‘तान्हाजी’ मराठीत
3 ‘टकाटक’च्या यशानंतर आता ‘टकाटक २’
Just Now!
X