News Flash

‘सुहानी सी एक लडकी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

'सुहानी सी एक लडकी' प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावर एकेकाळी गाजलेली ‘सुहानी सी एक लडकी’ ही मालिका साऱ्यांच्याच लक्षात असेल. या मालिकेतील सुहानी आणि युवराज या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं होतं. विशेष म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शेमारु टीव्हीवर ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळ सध्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

अलाहाबादमधील मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या सुहानी श्रीवास्तवची ही कथा. गोड समंजस्य आणि तितकीच लाघवी सुहानी अनेकांची मन जिंकते. तर तिची जीवलग मैत्रीण म्हणजे सौम्या मिश्रा. सुंदर दिसण्याचा सौम्याला फार गर्व असतो. या दोघींच्या मैत्रीमध्ये युवराज येतो आणि त्यांच्या मैत्रीचं गणित बदलतं. असं एकंदरीत या मालिकेचं कथानक आहे. ही मालिका एकेकाळी छोट्या पडद्यावर विशेष गाजली होती. त्यामुळे शेमारु टीव्हीवर ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री राजश्री राणी हिने सुहानी ही मुख्य भूमिका साकारली आहे.

आणखी वाचा- अस्सं माहेर नको गं बाईमध्ये समीर चौघुलेची एण्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका

“सुहानी सी एक लडकी ही मालिका माझ्यासाठी खास आहे. या मालिकेने मला खूप काही दिलं आहे. त्यामुळे शेमारु टीव्हीने ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला आनंद झाला आहे. या निर्णयामुळे पुन्हा नवा प्रेक्षकवर्ग माझ्यासोबत जोडला जाईल”, असं राजश्री म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 2:09 pm

Web Title: tv serial suhani si ek ladki appear again ssj 93
Next Stories
1 “हा सलमान खानचा चित्रपट नव्हता”; टीकाकारांवर दिग्दर्शिका संतापली
2 अभिज्ञा भावे पाठोपाठ आणखी एक मराठमोळा अभिनेता अडकला लग्न बंधनात
3 २१ वर्षांपूर्वी प्रियांका दिसायची अशी; पाहा देसी गर्लचं पहिलं फोटोशूट
Just Now!
X